Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४
रावेर येथून शेंगाव आणि बुलढाणा बसेस सुरु करावी
रावेर तालुका प्रतिनिधी :- रावेर ता.१२ येथून शेंगाव आणि बुलढाणा बसेस सुरु करण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख संदिपसिंह राजपूत यांनी जळगांव विभागाचे डि.सी जगनोर साहेब हे रावेर आगार विभागाला भेट देऊन प्रवाशी आणि कर्मचारीचे तक्रार सोडवण्यासाठी रावेर ला आले होते
यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.रावेर तालुक्यातील भाविक भक्तांची प्रवासाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रावेर आगारप्रमुखांना चार पाच वर्षे अगोदर निवेदन देऊन बस सुरू केली होती परंतु रावेर-शेगाव ही पिंप्री नांदू मार्गे सुटणारी बस अचानक बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली असून रावेर शहर आणि ग्रामिण भागातून भावीक फार मोठ्या प्रमाणावर श्री संत गजानन महाराज शेंगाव येथे माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात सर्व भाविक मंडळी हे आमच्याच आहे त्यांचे दुःख हेच आमचेचं दुःख ही भावना मनात ठेऊन त्यांना प्रवासाची अडचण होऊ नये आणि सुखरूप प्रवास व्हावा या शुध्द आणि प्रामाणिक हेतु डोळ्यासमोर ठेवून ही बससेवा पूर्वरत सुरु करावी तसेच रावेर ते बुलढाणा पर्यंत बस व्यवस्था नसल्याने पवाशांचे मराठवाडय़ात जाण्यासाठी हाल होतात हि पण अशी आमची मागणी रावेर ते बुलढाणा बस सुरु करावी हि बस सोडल्यास प्रवाशी संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख संदिपसिंह राजपूत तालुका उपाध्यक्ष अरुण चौधरी संजय नारखेडे स्वप्निल चौधरी योगेश चौधरी यांनी याबाबत लेखी निवेदन जिल्ह्याचे डि.सी व आगारप्रमुखांना दिले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा