Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
जि.प.प्रा.शाळा कात्राबाद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी परमेश्वर बोराडे यांची निवड....
जि.प.प्रा.शाळा कात्राबाद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी परमेश्वर बोराडे यांची निवड....
परंडा (राहूल शिंदे ) दि. ६ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पालक सभेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.
सदर पालक मेळाव्यास जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव अंकुश निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
प्रथमता सर्वांचे स्वागत करून शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कापसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निरीक्षक अंकुश जाधव यांनी पालकांना शाळा व्यवस्थापन समितीची रचना अधिकार व कार्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर प्रथम सर्व पालकांच्या चर्चेतून सदस्यांची निवड केली. सर्व सदस्यांच्या एकमताने परमेश्वर दत्तू बोराडे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. तसेच उपाध्यक्ष म्हणून इमरान इरशादअली पटेल यांची निवड करण्यात आली.
सदर समिती ही सन २०२४ ते २०२६ या कालावधीसाठी पुनर्गठीत करण्यात आली आहे.
समितीतील सदस्य खालील प्रमाणे अध्यक्ष परमेश्वर दत्तू बोराडे, उपाध्यक्ष इम्रान इशादाली पटेल,श्रीमंत महादेव गरड, महिला सदस्य म्हणून मोनिका विनोद बोराडे, सुकन्या नितीन नलवडे, उज्वला दादा बोराडे, प्रियंका शिवाजी काळे, संजीवनी महादेव मोरे, राणी जयवंत बोराडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोंडीराम कोकाटे, शिक्षण प्रेमी नागरिक विलास साहेबराव गरड, शिक्षक प्रतिनिधी दीपक प्रल्हादराव मिरकले, सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र माधव कापसे, विद्यार्थी प्रतिनिधी कु.जान्हवी देविदास बोराडे, व अरहान इम्रान पटेल यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष अमोल दादाराव गरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नूतन सदस्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..
सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक अंकुश जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक अशोक शिंदे हे लाभले... पालक सभेसाठी पालक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. या पालक सभेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कापसे यांनी केले तर आभार शाळेचे शिक्षक दिपक मिरकले यांनी केले...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा