Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
पोलीस व महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनांवर कारवाई करा मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश !
पोलीस व महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनांवर कारवाई करा मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश !
मुंबई. राज्यातील सर्व जिल्ह्यातील खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह व महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून फिरणाऱ्या वाहनांवर काटेकोरपणे कारवाई करण्याचे आदेश मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने काढले असून याबाबत कारवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्याचे निर्देश देखील परिवहन विभागाने दिले आहेत आता पोलीस व महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकारी खरोखरच कारवाई करतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी खाजगी वाहनांवर 'पोलीस बोधचिन्ह, तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग ,कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा विभाग, वन व पर्यावरण विभाग, मुद्रांक शुल्क विभाग, आरोग्य खाते, पशुसंवर्धन विभाग, शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, अर्थ व नियोजन विभाग यासह विविध खात्यामधील काम करणारे अधिकारी तसेच जिल्हा पातळीवर व विभागीय पातळीवर काम करणाऱ्या सर्वच कर्मचारी कामावर जाताना आपल्या खाजगी वाहनाने जातात व ज्या वाहनाने प्रवास करतात त्या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावतात
राज्यातील शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोलीस बोधचिन्ह व महाराष्ट्र शासन अशा पाट्या लावून नक्की सरकारी अधिकारी व पोलीस कर्मचारी अथवा पोलीस अधिकारी प्रवास किती करतात अथवा या नावाखाली बऱ्याचदा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुले व घरातील माणसे तसेच महाराष्ट्र शासन लिहिलेल्या पाट्या लावून अनेक अधिकाऱ्यांची मुले व घरातील व्यक्ती प्रवास करीत असल्याचे उघड झाले आहे याबाबत पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबतचा तक्रारी अर्ज ईमेल द्वारे राज्य शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर केला होता त्या अनुषंगाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी. म .अ.गिरी यांनी आदेश काढून मोटर वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांना आदेश दिले आहेत की आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिणाऱ्या वाहनांना तसेच वाहनात महाराष्ट्र शासन अशी पाटी किंवा बोधचिन्हाचा वापर वाहन मालक त्यांच्या वाहनांवर करीत असल्याचे वाहन तपासणीमध्ये निदर्शनास आल्यास दोषी वाहनांवर मोटर वाहन अधिनियम 1988 या अनुषंगाने नियमातील तरतुदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्यात यावा असे निर्देश सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला काढले आहेत
यापूर्वी देखील मुंबईचे वाहतूक पोलीस सह आयुक्त यांनी१४. ३.२०२२रोजी पोलीस पाटील लिहिलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात बाबत वाहतूक पोलिसांना आदेश काढून कारवाई करण्याबाबत सुचवले होते तसेच ७ सप्टेंबर २०१५ च्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रक नुसार पोलीस अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या मालकीच्या खाजगी वाहनांवर पोलीस चिन्ह अथवा नेमप्लेट लावतात अशा प्रकारच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाले आहेत ही कृती बेकायदेशीर असून पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी यांना त्यांच्या मालकीच्या खाजगी दुचाकी किंवा चार चाकी वाहनांवर पोलीस विभागाचे चिन्ह अथवा पोलीस अशी पाटी लावू नये अशा शब्द सूचना देण्यात याव्या तसेच सदर सूचनांचे काटेकर पुणे पालन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी प्रस्तुत सूचनाचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश गृह विभागाचे कक्ष अधिकारी विजय साबळे यांनी काढला होता
नवी मुंबई जवळील व मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळील कळंबोली वाहतूक शाखेने २१.०६.२०२४ ते २७.६.२०२४ या काळात कळंबोली वाहतूक शाखेच्या हाती पोलीस प्रेस महाराष्ट्र शासन व इतर नावे लिहिलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून ४४ वाहनांवर कारवाई केली आहे
मुंबई प्रादेशिक परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी ५जुलै २०२२ रोजी देखील खाजगी वाहनांवर वाहनात महाराष्ट्र शासन अशा पाट्या किंवा बोधचिन्हाचा वापर होत असल्याबाबत अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश काढले होते मात्र पोलीस व महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या वाहनांवर खरंच कारवाई होणार का झाल्यास कारवाई कोणी कोणावर करायची व ती कारवाई खरोखरच होईल का याबाबत जनतेच्या मनात याबद्दल शंका उत्पन्न होत आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा