Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४
शेणपुर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा...
शेणपुर (ता.साक्री) येथे हरीनाम सप्ताहनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक व पालखी सोहळा उत्साह झाला सप्ताहानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली.ज्ञानेश्वर पारायणा साठी गावातील महिला पुरुष ,व चिमुकले सात दिवस पारायण साठी बसले.१०ऑगस्ट पासून पहाटे काकड आरती,सकाळी नऊ ते ११ व दोन ते पाच पारायण सायंकाळी हरिपाठ रात्री ते अकरा किर्तन सात दिवसाचे कीर्तन व काल्याचे कीर्तन झाले. कीर्तन नंतर चहा पाणी श्री देविदास नामदेव भदाणे यांनी केला.त्यात सात दिवसाचा कीर्तनाचा व काल्याचा कीर्तनाचा मानकरी शेणपुर गावातील जय बजरंग मित्र मंडळ शेणपुर यांनी घेतला होता . व १६ ऑगस्टला ग्रंथराज संत ज्ञानेश्वरी पालखी मिरवणूक काढण्यात आली.१७ आगस्टला मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर याचे काल्याच्या कीर्तन झाले नतर शेणपुर गावातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रविण लक्ष्मण काकुस्ते व चंद्रशेखर अहिरराव यांनी मागील वर्षी पारायनला बसलेले सर्व कीर्तनकार महाराज गायन आचार्य, व्यासपीठ,इत्यादी याना पांडुरंग याची मुर्त्या वाटप केल्या होत्या या वर्षी देखील त्यांच्या कडुन श्री छत्रपती महाराज याच्या मुर्त्या वाटप करण्यात आल्या.व नंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला.या वेळी दहीहंडी फोडण्याचे मानकरी श्री.भटु गेंदा नंदन शेनपूर यांना मिळाला नंतर पुढील वर्षी चा सात दिवसाचा कीर्तन व काल्याचे कीर्तनाची सेवा व सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे सायंकाळची भोजनाचा मान परत
श्री जय बजरंग मित्र मंडळ शेणपुर यांनाच मिळाला म्हणुन जय बजरंग मित्र मंडळ चे अध्यक्ष उपाध्यक्ष.सचिव.व सर्व सदस्य.यांना मिळाला
यांनी ह.भ.प. मंडळ गावातील नागरिकांचे आभार मानले.त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचे मानकरी श्री सद्गुरू शंकर जी महाराज मित्र मंडळ यांना देण्यात आला होता. विशेष सहकार्य हभप भजनी मंडळ शेणपुर व ग्रामस्थानी केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा