Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल
अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल
धुळे (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (अतिरिक्त कार्यभार) अधीक्षक मिनाक्षी भाऊराव गिरी यांना २ लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज सायंकाळी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत सुरू होते.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा