Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न...
व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न...
परंडा (राहूल शिंदे) दि. ८ तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत पत्रकार बांधवांच्या विविध समस्यांचा आढावा घेत मराठवाडा विभागीय अध्यक्ष यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले, पत्रकार बांधवांना येणाऱ्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपली पत्रकार संघटना कायम पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील व पत्रकारांचे प्रश्न सोडविणे, पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, आणि पत्रकारांना घरे अशा विविध पंचसूत्री कार्यक्रमावर आपली संघटना महाराष्ट्रभर काम करते असे मत मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी बैठकीमध्ये व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा अध्यक्ष ओंकार बनसोडे, जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत, परंडा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, तालुका अध्यक्ष प्रमोद वेदपाठक, कार्याध्यक्ष मुजीब काझी, सचिव तानाजी घोडके, सहसचिव रवींद्र तांबे, मराठवाडा सदस्य आप्पासाहेब शिंदे, श्रीराम विद्वत, समीर ओव्हाळ, संतोष शिंदे, धनंजय गोपने,विजय मेहर, साजिद शेख, गोरख देशमाने, फारुख शेख, रावसाहेब काळे, नानासाहेब केसकर, पांडुरंग ठोसर, उत्तरेश्वर शिंदे आधी सह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी घोडके यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा