Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४
पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार...
परंडा (राहुल शिंदे) दि.१३ महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आ. तानाजी सावंत यांचे पुतणे मा. जि.प उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी येथील निवासस्थानी काल मध्यरात्री १२:३७ ला गोळीबार झाल्याची माहिती आहे रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याची माहिती धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून आंबी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. गोळीबार कोणी केला हे अद्यापस्पष्ट झाले नसुन पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते उद्या दि. १४ रोजी परंडा तालुक्यात येत असून त्याच्या अगदी आदल्या दिवशी ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दोन दिवसापूर्वी गावभेट दौऱ्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कामावरून गोंधळ झाला होता त्या दृष्टीने संशय व्यक्त केला जात आहे. एका आंदोलकाकडे बंदूक होती. पोलीस सुरक्षा तैनात असताना देखील शास्रधारी आंदोलक पालकमंत्री यांच्याजवळ पोहचला होता. यावेळी धनंजय सावंत उपस्थित होते. गोळीबाराला या वादाची पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
© डॉ. दिलीप तिवारी पाळधी - तरसोद बायपासवरील रेल्वे पुलाचा तरसोदकडील भागाचा उजवीकडील भराव कोसळून तीन महिने होत आले आहेत. तेथील दुरुस्तीच्या क...
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा