Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक धनगर, शहराध्यक्षपदी राजेश्वर शिवदे यांची केली नियुक्ती




शिरपूर प्रतिनिधी:- आ.काशिराम पावरा यांना निवडुन आण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे - बबनराव चौधरी धुळे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक बापु धनगर रा. निमझरी ता. शिरपुर जि. धुळे यांची तसेच शिरपुर भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी शहराध्यक्षपदी राजेश्वर प्रभाकर शिवदे (भोई) रा. शिरपुर जि. धुळे यांची नियुक्ती धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे. दिपक धनगर व राजेश्वर शिवदे यांना बबनराव चौधरी यांचा हस्ते शिरपुर येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्ती पत्र देतेवेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, उद्योग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र राजपुत, विधानसभा विस्तारक दिगविजय गाळणकर, रविंद्र (बापु) सोनवणे, राजेंद्र सोनवणे, शांताराम कोळी, संदीप मोरे, जितेंद्र लोहार, सचिन बडगुजर, राहुल शेटे, पवन कोळी, ललित शिवदे, विलास साठे, भोजु ढोले, परेश पाटील, मयुर सोनवणे आदि उपस्थितीत होते. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बबनराव चौधरी म्हणाले की, शिरपुर विधान सभा मतदार संघात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. काशिराम पावरा असुन भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेवुन मोठ्या मताधिक्याने निवडुन आण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहान केले. ‘शिरपुर’च्या सलग चौथ्यांदा विजयाचा निर्धार, शिरपुर विधानसभेत यंदा भाजपाच्या विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांसमवेत केला. महायुती सरकारने समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी निर्णय घेतले. असून राज्यात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. शिवाय महायुती सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भक्कम साथ मिळाल्याने राज्यात विकासाला ‘डबल इंजिन’ची गती मिळाली आहे. 

दोन्ही सरकारची कामगिरी घरोघरी पोहोचविण्यासह विरोधकांचा खोटा प्रचार उघडकीस आणणे, प्रचाराची दिशा आणि नियोजन अशा विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दिपक धनगर व राजेश्वर शिवदे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. की, आपण सामाजिक व विविध क्षेत्रात काम करीत आहात. त्याची दखल घेवून आपली ही नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा उपयोग पक्षवाढीसाठी निश्चितपणे होईल. आपण ही जबाबदारी सर्वाना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल,असा मला विश्वास आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व आपल्या आगामी कार्यास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असे नमुद केले आहे. दिपक धनगर व राजेश्वर शिवदे (भोई) यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध