Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

महायुतीचा शिवसेना शिंदे गटाकडून आ.मंजुळा गावितांना उमेदवारी जाहीर ,शक्तिप्रदर्शनासह उद्या भरणार उमेदवारी अर्ज



साक्री विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मंजुळा गावित यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असून त्या
उद्या २४ ऑक्टोबरला सकाळी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.यावेळी आ.किशोर दराडे
संपर्क प्रमुख विजय करंजकर,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित,भाजप जिल्हाप्रमुख बबन चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश सोनवणे,भाजप धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील आरपीआयचे शशिकांत वाघ तसेच साक्री तालुक्याचे,अरविंद भोसले,नाना नागरे,बापू गिते,सुरेश पाटील,विजय भामरे,अजय सोनवणे,यांच्यासह पदाधिकारी व साक्री तालुक्यातील आ.मंजुळा गावित यांच्यावर प्रेम करणारे तालुक्यातील सर्वच गाव व खेड्या पाड्यातील कार्यकर्ते उपस्थित राहतील.आज दुपारी तीन वाजेला साक्री शहरात सिंधी मंगल कार्यालय येथे महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती त्यात सर्वांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत महायुती धर्म पाळावा अशा सूचना भाजप,शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या.मात्र या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत साक्री तालुक्यातील भाजपचा एक गट अनुपस्थित होता.यामुळे सर्वांचाच भुवया उचवल्या आहेत.उद्या सकाळी दहा वाजेला छत्रपती शिवाजी वाचनालया पासून शक्तीप्रदर्शन करत माझी आ.मंजुळा गावित या उमेदवारी अर्ज दाखल करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध