Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

साक्री विधानसभेसाठी आता माघार नाही इंजि.के.टी.सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवारी करीत रणसिंग फुकले आहे



धुळे प्रतिनिधी साक्री विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार इंजिनिअर श्री के.टी.सूर्यवंशी यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.त्यांच्या गाव भेटींमध्ये कार्यकर्त्यांकडून मिळालेला जोरदार प्रतिसाद हे त्यांच्या लोकप्रियतेचे खरे प्रमाण आहे.
इंजि.के.टी.सूर्यवंशी यांच्या मागे कार्यकत्यांचा गोतावळा पाहून विरोधकांच्या गोटात खळबळ उडायला लागली आहे.साक्री तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी,सगे-सोबरे यांच्याशी चर्चा करून आणि भेटीगाठी घेत मतदारांचा जोरदार प्रतिसाद
मिळत आहे.साक्री विधानसभा मतदारसंघात इंजि.के.टी.सूर्यवंशी हे शेतकरी,कष्टकरी आणि दिनदुबळ्यांचे हित जाणणारे प्रभावी नेतृत्त्व
मानले जात आहेत.येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना शह देण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.साक्री व पिंपळनेर मंडळातील मतदारांना प्रत्यक्ष भेटून इंजिनीयर के.टी.सूर्यवंशी यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. साक्री तालुक्याच्या जनतेची
जुळलेली नाळ मजबूत असल्याने ती जमेची बाजू आहे.
साक्री तालुक्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता आता हवा चेहरा नबा आहे.आता माधार नाही.पूर्ण ताकतीने लढणार आणि जिंकणार ही
अशीच भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.साक्री तालुक्यातील जनतेचा हा उस्फूर्त प्रतिसाद निश्चितच आगामी निवडणुकीसाठी सकारात्मक संकेत देत आहे.साक्री विधानसभेसाठी आता माधार नाही;इंजि.के.टी.सूर्यवंशी यांनी फुंकले रणशिंग आता माघार कुठल्याही परिस्थितीत घेणार नाही आशा सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध