Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिक्षण विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांवर धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची दुसऱ्यांदा कारवाई, धुळे एसीबी कडून गुन्हा दाखल
शिक्षण विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांवर धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची दुसऱ्यांदा कारवाई, धुळे एसीबी कडून गुन्हा दाखल
धुळे प्रतिनिधी - शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात अमुलाग्र बदल करत असते. त्यामुळे ज्ञानदान हे महान कार्य समजले जाते. आणि त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदर देखील मोठा असतो. मात्र याच शिक्षण विभागाला लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. आणि यांच्यामुळे शिक्षण विभाग देखील कलंकित झाला आहे. मागील काळात धुळे लाच लाचलुचत प्रतिबंधक विभागामार्फत शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लाच घेताना रंगेहात अटक करून कारवाई करण्यात आली होती. आता महिनाभरात पुन्हा एकदा शिक्षण विभागातील लाच मागणी प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्याला धुळे एसीबी चे अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एकीकडे या कारवाईचे जिल्हाभरातून कौतुक होत असताना, शिक्षण विभागात मात्र खळबळ माजली आहे.
लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सांकी, जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी तक्रारदार यांचे कडून २,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती, ही गोष्ट सिद्ध झाली म्हणुन एसीपी कडून गुन्हा दाखल झाला आहे.
तकारदार यांचे ओम साई इन्टरप्राइझेस या नावाचे पिंपळनेर, ता. साकी जि. धुळे येथे दुकान आहे. सदर फर्म मार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे पुरवठा करणे बाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साकी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकुण ४०,००,०००/- रूपयांच्या बुट व पायमोजे हया वस्तु पुरवठा केल्या होत्या.
सदर अनुदान मागणीच्या फाईल जमा करून मला सदर वस्तुंचे बिल मला अदा करणे लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सांकी, जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी बुट व पायमोजे हया वस्तुंच्या बिल मागणीचे फाईल जमा करून अंदाजे एकुण ४०,००,०००/- रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे २,००,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.३०.०९.२०२४ रोजी तकार केली होती.
सदर तकारीची दि.३०.०९.२०२४ रोजी व दि.०१.१०.२०२४ रोजी पडताळणी केली असता गट शिक्षण अधिकारी, महेंद्र सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे बुट व पायमोजे हया वस्तुंचे अंदाजे एकुण ४४,००,०००/- रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे २,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
धुळे जिल्ह्यातील कोणताही लोकसेवक सरकारी काम करून घेण्यासाठी आपल्याकडून लाचेची मागणी करत असेल, तर आपण धुळे जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा