Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४
सामाईक भिंत बांधण्यावरून वाद, अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे.*
याबाबत यमुना उज्जैन पाटील (वय २२) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार ९ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना घराशेजारी राहणारा राकेश दगडू पाटील हा आला, आणि भिंतीचे काम करू नका असे सांगितले.तसेच त्याने वडील दगडू चैत्राम पाटील यांना बोलावून आणले. त्यांना फिर्यादी व तिचे वडील यांनी आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार काम करीत आहोत असे सांगितले, मात्र दगडू पाटील यांनी फिर्यादीची बहिण भावना हिच्या हातातील मोबाईल फेकला. त्यानंतर दगडू याची मुलगी सुरेखा उर्फ पूनम हिने भावना हिच्या छातीवर बसून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी व तिचे आई वडील गेले असता त्यांनाही ढकलून देत मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या डोक्याला, हाताला व तिच्या वडिलांच्या नाकाला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर ११ रोजी उपचार घेवून घरी परत येत असताना पुन्हा दगडू पाटील याने घरासमोर येऊन शिवीगाळ केल्याने फिर्यादीने अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल केली असून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास हेकॉ गणेश पाटील करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर आज एका थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या ...
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा