Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
पाच वर्षात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त अनिल दादांनीच दिली साथ...
पाच वर्षात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त अनिल दादांनीच दिली साथ...
तालुक्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष यशोदिप पाटील
अमळनेर:- तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केवळ मंत्री अनिल पाटील यांनीच प्रयत्न केले असून तालुक्यातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी असल्याचे मत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मागील वर्षी सन २०२३ मध्ये कोरडा दुष्काळ असल्याने प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फी माफ करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांचे पाठबळ लाभले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जमा केलेली फी परत करून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. कोरोना काळात तब्बल ८० विद्यार्थी विद्यापीठाच्या चुकीमुळे नापास झाले होते, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांनी स्वतः पाठपुरावा केला. तसेच शिष्यवृत्ती, वस्तीगृह, एस.टी पास यासंबधी असलेल्या अनेक समस्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व मंत्री अनिल दादा पाटील यांच्या पाठपुरावामुळेच सोडवण्यात आल्या. त्यावेळी तालुक्यातील एकाही माजी लोकप्रतिनिधी किंवा इच्छुक उमेदवार यांनी लक्ष दिले नाही. गेल्या पाच वर्षात फक्त भूमिपुत्र अनिल दादा पाटील हेच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे यंदा निवडणुकीत तालुक्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मंत्री अनिल पाटील यांनाच साथ देणार असून ते बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील व शहराध्यक्ष कृष्णा बोरसे यांनी व्यक्त केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा