Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
ट्रॅक्टरच्या धडकेत पारोळ्याचा मोटरसायकलस्वार ठार
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
गिरीधर इंदरलाल सिंधी वय४२ रा जैन मंदिर समोर हत्ती गल्ली पारोळा हे मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी एच ६६३८ वर पारोळा जाण्यासाठी अमळनेरहून निघाले. सुमारे ८ वाजेच्या सुमारास एका विना नंबरच्या ट्रॅक्टरने समोरून जोरदार धडक दिल्याने ते मोटरसायकलसह खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागून ते रक्तबंबाळ झाले. कुणीतरी त्याच्या मोबाईल वरून त्याचे नातेवाईक व्यापारी रविकुमार वसंतकुमार माधवाणी रा सिंधी कॉलनी अमळनेर याना कळवले. अमळनेर पोलिस स्टेशनला रविकुमार यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रॅक्टर चालक विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१),२८१, १२५(अ),१२५(ब), ३२४ (४) मोटरवाहन कायदा कलम १८४ , १३४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा