Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
चोपडाई कोंढावळ ला एस एस टी पथकाने गुटखा पकडला
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त करून ढेकू रोडवरील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडाई कोंढावळ येथे एस एस टी पथकात कर्तव्यावर असणारे हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील , कृषी पर्यवेक्षक योगेश ललित खैरनार , पोलीस विजय अशोक पाटील आणि फोटोग्राफर समाधान आगळे यांनी ९ रोजी रात्री साडे अकरा वाजता धुळ्याकडून अशोक धुडकू पाटील रा श्रीरामनागर ढेकू रोड अमळनेर हा कार क्रमांक एम एच १८ , ए जे ७१६० मधून येत असताना पथकाने कार अडवली. कार च्या मागच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे गोणीत गुटखा तंबाखूचा वास येत होता. पथकाने ताबडतोब पोलीस निरीक्षक विकास देवरे , पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल , रवींद्र पाटील ,अमोल पाटील यांना कळवून बोलावून घेतले. पोलिसांनी गोणीतून ३८ हजार ८९६ रुपयांचे विमल गुटख्याचे २०८ पाकीट , ६ हजार ८६४ रुपये किमतीची २०८ तंबाखू पाकिटे तसेच ३ लाख रुपयांची कार आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३ लाख ५० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अशोक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३ , २७४,२७५ नुसार कारवाई करण्यात आली. तपास उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा