Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा "बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे" हा नारा महत्वाचा ठरला.यावेळी राज्यातील हिंदू मते वळवण्यात भाजपला मोठे यश.





निवडणुका झाल्या निकाल लागले.निकाल धक्कादायक आहेतच.पण जो तळागळातील कार्यकर्ता होता त्याला कदाचित हा निकाल इतका धक्कादायक वाटत नसावा.
मराठी माध्यमांनी महाराष्ट्राचे रणनितीकार म्हणून नेहीप्रमाणेच ज्या नेत्याला चाणक्य,जाणता राजा वगैरे पदव्या बहाल केल्या तो शेवटच्या क्षणी काही विकृत कारस्थाने करून पुन्हा गेल्यावेळ सारखे राज्य आणेल म्हणून त्याला ती संधीच न ठेवता जनतेने त्याच्या विकृत कारस्थान प्रणालीला पूर्ण पणे बाहेर फेकून दिले आहे.
ज्याने हिंदुत्व आपल्या खुर्चीसाठी विकून अनेक भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांना अनुयायांना निराशेच्या अंधारात लोटले,ज्याच्या बद्दल चाय बिस्कीट माध्यमांनी सहानुभुतीचे वातावरण निर्माण केले अशा नकली,ढोंगी,अहंकारी माणसाला,त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षाना कायमचा प्रतिबंध घालून जनतेने त्याला घरी बसवले.
संविधान आणि आरक्षण आणि जातीनिहाय गणना ह्या मुद्द्यांना घेवून हिंदूंच्या मधील जात व्यवस्थेचे संघर्षात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करणारा सॉरासचा एजंट आणि त्याचे चार चमचे ( संगमनेर, कऱ्हाड,लातूर आणि साकोल) जे आपल्या आपल्या ठिकाणी सरंजामदार होते ह्या सगळ्यांना हिंदू समाजाने एकमुखाने नाकारत कायमचे घरी बसवले आहे.
महाराष्ट्राचे उद्योग गुजराथने पळवले,गुजराथचे महाराष्ट्रावर आक्रमण हे भंपक विमर्श पसरवणाऱ्या भोंग्याला आणि त्याचे प्रसारण करणाऱ्या माध्यमांना समाजाने जागा दाखवून दिली आहे.मोदी, शहा,योगी यांचा मर्यादा सोडून अपमान आणि अडाणी, अंबानी यांचे भजन आणि त्यातून विकासाला विरोध हे आता लोकांना सहन होण्याच्या पलीकडे आहे. 
महिलांच्या प्रती दुय्यम भाव, त्यातून लाडकी बहीण योजनेला विरोध याचा महिलांच्यावर होणारा परिणाम हे लक्षात न घेता नाना गँग उद्धट पणे बोलत राहिली.अहिल्या नगर झाले आणि त्यांनी अहिल्यादेवी यांच्याशी जणू वैर धरले. लोकांना हे कळत होते.महिला प्रक्षुब्ध होत्या.लव्ह जिहाद कडे काना डोळा करणारे सरकार महिलांना नको होते.
छत्रपतींचा बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी समाज मतदानाला सज्ज झाला होता.एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र हा संतांचा संदेश समाजाला भावला होता. त्यामुळे आपल्या मतांच्या शक्तीची जाणीव त्याला झाली होती. हनुमंताला जांबुवंत आठवण करायला होते,अर्जुनाला युद्धासाठी भगवान श्रीकृष्ण सिद्ध करण्यास होते. येथे समाजरुपी हनुमंत आणि अर्जुन याना असंख्य जांबुवंत आणि श्रीकृष्णांनी जागे केले,सिद्ध केले आणि त्यामुळे ह्या रामायण,महाभारतात रावण , कुंभकर्ण,शुर्पणखा, दुर्योधन,दुःशासन भस्म झाले.

हा निकाल कुणा एका पक्ष,संघटना,नेता यांचा विजय आहे असे मानण्याची आवश्यकता नाही.हा विजय समाजाने साकारलेला विजय आहे.हा समाजाचा विजय रामगिरी महाराज याना धमकी देणाऱ्यांना थप्पड मारणारा आहे.हा समाजाचा विजय मुस्लिम समाजाबरोबर निर्ल्लज पणे गुडघे टेकवून हिंदूंच्या जमिनी,मंदिरे आणि माता भगिनी यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या लोकांना कानशिलात मारणारा आहे.
छत्रपती शिवरायांचा,संभाजीराजे यांचा इतिहास  विकृत करून त्यावर आपल्या मतांचा सौदा करण्यासाठी बी ग्रेड आणि तत्सम संघटना यांच्या माध्यमातून डाव रचणाऱ्या मंडळींना समाजाने त्यांची जागा दाखवली आहे.हिंदूंचे श्रद्धास्थान मग स्वामी समर्थ असो प्रभू रामचंद्र असो किंवा गणपती असो त्याची चेष्टा करणारे कायमचे घरी बसवण्याचे काम या निमित्ताने झाले आहे
हिंदू समाजाने केवळ एव्हढे एक काम केले की हिंदू म्हणून मतदान करायचे ठरवले,तर ह्या राष्ट्रविरोधी शक्तींचा पालापाचोळा झाला.जर पुढील काळात उर्वरित ३५ टक्के हिंदूंनी  मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे ठरवले तर हिंदूंच्या विरुद्ध वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.पुढील काळात त्यासाठी सजग राहण्याची ही खरी सुरुवात झाली आहे.
आचार्य स्वामीजी गोविंददेव गिरी,रामगिरी महाराज यांच्या पासून सर्व संत महंत ह्या वेळी कुठलाही आड पडदा न ठेवता बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करत होते.अनेक विचारवंत,पत्रकार , लेखक पत्रकार पायाला फिरकी लावून महाराष्ट्र पिंजून काढत होते.उदय निरगुडकर ,सुरेश चव्हाणके हे त्यात अग्रेसर होते.नरेंद्र पाटील मराठा समाजाला समजावून सांगण्यासाठी अहोरात्र फिरत होते.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे‌ वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या कष्टाला तर तोड नाही.राहुल सोलापूरकर सारखे अभिनेते आणि अविनाश धर्माधिकारी सारखे माजी सनदी अधिकारी यात मागे नव्हते.
एकीकडे संविधान,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे पण सातत्याने त्यांचा अपमान करायचा.काँग्रेसचा हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील काळा इतिहासच ह्या निमित्ताने पुढे आला.क्षितिज गायकवाड सारखे दलित तरुण नेते हिरीहिरीने पुढे आले त्यांनी मांडलेला विषय दलित बंधूंना समजत गेला हे आणखी एक ह्या निवडणुकीचे सकारात्मक वैशिष्ट्य.
ह्या सगळ्या घडामोडीत समाजाने निवडणूक हातात घेतली.समोरून कट,कारस्थाने,अन्याय ह्याचा कळस गाठल्यावर समाजाने पक्का निर्धार केला.जाती मध्ये विभागण्यावर,'एक है तो सेफ है'किंवा 'बटोंगे तो कटोंगे' ह्या घोषणा आणि त्या मागील आशय समाजाने लक्षात घेतला आणि तेथेच निवडणूक निकाल नक्की झाला.मतदानाची वाढलेली टक्केवारी सांगत होती निकाल काय लागणार !
औरंगजेब,अहमद शहा यांचे उदात्तीकरण करताना अहिल्या देवी,संभाजी राजे याना नाकारणे,पांडुरंगाच्या वारी मध्ये घुसून त्याला अपवित्र करणे आणि एकात्म वारकरी समाजात छेद निर्माण करणे ह्या गोष्टी हिंदू समाजाला बिलकुल आवडलेल्या नाहीत.पुढील काळात हिंदू समाजाला कुणी गृहीत धरून चालणार नाही हे येथे स्पष्ट झाले आहे. 
महायुतीतील सर्वच पक्षाच्या उमेदवारांना,समाजाने हिंदुत्वाचा  राजकीय आशय स्वीकारल्यामुळे विजय प्राप्त झाला आहे हे समजून घेण्याची गरज आहे.
निखिल वागळे,विश्वंभर,सरोदे सहित उल्का आणि तथाकथित पुरोगामी काजवे याना आता अंधारात नाही तर हिंदुत्वाच्या स्वच्छ आणि दैदिप्यमान प्रकाशात आपले अस्तित्व शोधावे लागणार आहे. महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने आता कात टाकली आहे. 
समाजाने समाजासाठी लढवलेली ही निवडणूक होती.
व्होट जिहाद,वक्फ बोर्ड आणि लव्ह जिहाद याने क्षुब्ध झालेल्या हिंदू मनाला ही निवडणूक व्यक्त होण्याची संधी
होती.ती ह्या समाजाने चोख पणे साधली.त्यामुळे हा विजय समाजाला समर्पित करू या आणि सजग राहण्याचे हे आंदोलन दीर्घकाळ पुढे नेण्यासाठी सज्ज होवू या !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध