Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४
दिनदयाळ आदिवासी सुतगिरणी संचालक कै.अनिल बागुल यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
साक्री तालुक्यातील माजी खासदार कै. डॉ. साहेबराव बागुल (भाजप) यांचे लहान बंधु तसेच डॉ.तुळशिराम गावीत शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार सौ.मंजुळाताई गावीत याचे खंदे समर्थक तसेच साक्री तालुक्यातील दिनदयाळ आदिवासी सुतगिरणी संचालक कै.अनिल बागुल
यांचे अल्पशा आजाराने दि. 04/11/2024 रोजी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी दि.5 नोव्हेंबर 2024 राजी शेवगे ता.साक्री येथे करण्यात आला. कै.अनिल बागुल यांनी
पंचायत समिती साक्री जे माजी सदस्य,शेवगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच या पदावर काम केले होते.अत्यंत तळागाळातील कार्यकर्ता,सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे,मनमिळाऊ स्वभावाचे,मितभाषी म्हणून त्यांची संपुर्ण साक्री तालुक्यात ओळख होती. आपला अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याचे दुःखद निधन झाल्यामुळे आमदार सौ. मंजुळाताई गावीत,शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.तुळशिराम
गावीत,युवा नेते सागर गावीत,पंकज मराठे नगरसेवक साक्री,अॅङ ज्ञानेश्वर एखंडे,संभाजी अहिरराव,अजय सोनवणे,जितू शिरसाठ,गोटू चौरे,बंडू नांद्रे,गोकुळ परदेशी,अमोल सोनवणे, जितेंद्र खैरणार,विजय भामरे,अशोक मुजगे,राजेश बागुल,अजित बागुल (स्वीय सहाय्यक), विजय कुलकर्णी (स्वीय सहाय्यक) व परीसरातील सरपंच,उपसरपंच,कार्यकर्ते यांनी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा