Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

वृद्धाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन, पोलिसांत गुन्हा दाखल



अमळनेर (प्रतिनिधी) वृद्धाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याची घटना तालुक्यातील प्र. डांगरी येथे येथे घडली. यामुळे संताप व्यक्त होत असून याप्रकरणी  मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २२ रोजी मुलीचे आई वडील हे मजुरीसाठी शेतात गेले होते. त्यामुळे पीडिता तिच्या बहीण भाऊसह घरीच होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडिता अंडे घेण्यासाठी दुकानात गेली असता परत येताना गावातील धुडकु बडगुजर (वय ६३) याने तिला दोन रुपयाचे आमिष दाखवत मोरीत नेले. तिचे अंतर्वस्त्र काढल्याने पीडिता घाबरून गेल्याने तिने पळ काढला. सायंकाळी पीडितेचे आई वडील घरी आल्यावर तिने त्यांना हकीकत सांगितल्याने सदर मुलीच्या आईने मारवड पोलिसांत धाव घेवून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोक्सो, अट्रोसिटीसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध