Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
भाजपा प्रांतिक सदस्य आबासाहेब सुरेश रामराव पाटील यांचा वाढदिवसानिमित्त आ.मंजुळा गावित व तुळशीराम गावित यांचा हस्ते सत्कार
भाजपा प्रांतिक सदस्य आबासाहेब सुरेश रामराव पाटील यांचा वाढदिवसानिमित्त आ.मंजुळा गावित व तुळशीराम गावित यांचा हस्ते सत्कार
साक्री: साक्री तालुका विद्या विकास मंडळाचे
सचिव तथा भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आ.मंजुळा गावीत,शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित यांनी सुरेश पाटील व त्यांच्या धर्मपत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मंगलाताई पाटील यांची धुळे येथील निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील उपस्थित होते.त्याचबरोबर राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेत अभिष्टचिंतन केले.साक्री तालुक्यातून तसेच धुळे शहरासह जिल्ह्यातून आलेल्या चाहत्यांनी सकाळपासूनच सुरेश पाटील यांच्या धुळे येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.दिवसभरात साक्री तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच
अनेक विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी व संचालक मंडळ,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य,नगरसेवक,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी,पत्रकार,
कार्यकर्त्यांनी तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी सुरेश रामराव पाटील यांनी तसेच त्यांचे सुपुत्र तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा