Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १ डिसेंबर, २०२४

महाळपुर येथील पत्रकारास जिवे मारण्याची धमकी - पो.स्टे.ला तक्रार दाखल



शिंदखेडा प्रतिनिधी - तालुक्यातील महाळपुर येथील पत्रकार व व्यापारी धनराज भाऊ निकम यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सविस्तर असे की,महाळपुर येथील रहिवासी धनराज निकम पत्नी, आई-वडील व मुले यांच्यासह एकत्र कुटूंबात राहतात.
किराणा दुकान चालवुन ते आपला उदर निर्वाह चालवतात.तसेच साप्ताहिक स्वराज्य मित्र या वृत्तपत्राचा संपादक देखील आहेत.दुकानावर बसले असताना गावातील एका व्यक्ती ने हल्ला केला.या विषयी धनराज निकम यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारीत म्हटले आहे की,सामनेवाला हा मौजे महाळपुर येथील कायमचा रहिवाशी असुन खुनशी वृत्तीचा व गुंड प्रवृत्तीचा इसम आहे. 

सामनेवाला हा गावात दहशत निर्माण करतो व दारु पिऊन शांततेचा भंग करत असतो.दि.२९/११/२०२४ रोजी शुक्रवारी सायंकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास सामनेवाला हा माझ्या किराणा दुकानासमोर येवुन माझे घरकुल का मंजुर झाले नाही, असे म्हणुन अश्लिल शिवीगाळ केली.तु पत्रकार आहे, तरी भी घाबरणार नाही, मी पोलिसांना देखील घाबरत नाही, माझ्या मोठ मोठ्या लोकांशी ओळखी आहेत.असे म्हणुन सामनेवाला याने माझ्या किराणा दुकानातील सामनाची नासधूस केली.मला मारण्यास धावुन आला व जिवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे मी माझ्या जिवाच्या स्वरक्षणासाठी पोलिस विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधुन पोलिसांना तात्काळ बोलवुन घेतले व पोलिस आल्यावर देखील पोलिसांच्या समोर सामनेवाला हा मला दादागिरी करत होता व पोलिसांचे देखील ऐकत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी सामनेवाला याला समज दिल्यानंतर तो घटनास्थळावरुन चालला गेला व जाता जाता सांगत होता की, तुला या गावात राहु देणार नाही, तुझा खुन करून टाकू, त्यामुळे सदरची तक्रार देणे भाग झाले आहे.तरी माझी विनंती की, सामनेवाला याच्यापासुन माझ्या जिवास धोका निर्माण झाला असुन सामनेवाला याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा व सामनेवाला यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती तक्रार अर्जात नमूद केली.शिंदखेडा पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध