Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
राज्यात सर्वात तरुण आ.रोहित पाटील विधिमंडळात पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा : तरण्याबांड आमदाराचा विधिमंडळात घुमणार आवाज
राज्यात सर्वात तरुण आ.रोहित पाटील विधिमंडळात पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा : तरण्याबांड आमदाराचा विधिमंडळात घुमणार आवाज
तासगाव - कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित पाटील यांची पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही निवड जाहीर केली.या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे.अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकल्याने त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातून बाजी मारली.या मतदारसंघात स्व.आर.आर.पाटील कुटुंबीयांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी,माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते.राज्याचे लक्ष लागून लागलेला राहिलेल्या या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांना धूळ चारली. देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला दरम्यान,तासगाव - कवठेमहांकाळमध्ये महाविकास आघाडीचा आमदार झाला असला तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून 60 उमेदवारही निवडून आणता आले नाहीत.त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही,याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
दरम्यान,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची आज निवड करण्यात आली.या निवडीमुळे तासगाव - कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत.परंपरागत प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज 'एन्ट्री' केली आहे.आर.आर.पाटील यांचे चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांच्या नावाभोवती 'ग्लॅमर' आहेच.मात्र आता देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांचा देशभर नावलौकिक होत आहे.
अत्यंत नम्र,अभ्यासू,कोणत्याही गोष्टीचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा स्वभाव,वक्तृत्व कौशल्य, साधी राहणी - उच्च विचारसरणी यामुळे रोहित पाटील यांच्याकडे नेहमीच सर्वांचा 'फोकस'असतो.आता ते राज्याच्या विधानसभेत काम करताना दिसणार आहेत.वय कमी असले तरी अभ्यासू वृत्तीमुळे विधानसभेत ते विरोधी बाकावर बसूनही आपला आवाज घुमवतील,यात शंका नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांची आज पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड केली. त्यांच्यावर आता पक्षाने अधिकची जबाबदारी टाकली आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तरुण आमदारांना पुढे आणून आगामी काळात त्यांना राज्याचे भविष्य बनविले जात असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा