Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

पावणेदोन कोटींचा गुटखा पकडला




अमळनेर : दिल्लीहून महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांकडून एलसीबी पोलिसांनी पावणे दोन कोटींचा गुटखा १ डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णाड फाटा येथे पकडण्यात आला.


एलसीबी चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड याना दिल्ली हुन इंदोर बऱ्हाणपूर मार्गे अवैध गुटख्याचा तपकिरी रंगाचा ट्रक मुक्ताईनगर तालुक्यातून महाराष्ट्रात येत असल्याची माहिती ३० रोजी मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे , हेडकॉन्स्टेबल दीपक माळी , हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील ,मुरलीधर धनगर ,सचिन पोळ याना घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यास सांगितले. पूर्णाड फाट्यावर पोलिसांनी १ रोजी पहाटे सापळा लावून ठेवला होता. ६ वाजेला ट्रक क्रमांक एन एल ०१ , ए जे १७२५ आला. त्याला अडवले असता संशय येऊ नये म्हणून त्यावर तिहेरी ताडपत्री टाकली होती. पोलिसांनी चौकशी केली असता तयार गुटखा आढळून आला. चालकाला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सकरुल्ला अब्दुल अजीज वय ३५ रा इमाम नगर ता जेरका फिरोजपुर जिल्हा नऊहू मेवात राज्य हरियाणा असे सांगितले तर गाडीतील दोघांनी आपली नावे कैफ फारुखखान वय १९ रा ढळायत ता पहाडी जिल्हा भरतपूर राज्य राजस्थान व तारीक लुकमान खान वय २३ रा इमाम नगर हरियाणा असे सांगितले. पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात १ कोटी ७८ लाख ६६ हजार ८० रुपयांचा गुटखा आणि मालट्रेक असा एकूण २ कोटी ८ लाख ८२हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक करम्यात आली आहे. एलसीबी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी अभिन्ननदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध