Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२५
भोई समाजाचे तिरुपती बालाजी येथे 18 जानेवारीपासून अधिवेशन
शेगाव शहर प्रतिनिधी:अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्यावतीने जानेवारीपासून १८ तिरूपती बालाजी येथे भोई समाजाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे करण्यात आले आहे.आयोजन भोई समाजाच्या विविध मागण्यांसाठी यावर्षी संघटनेने हे अधिवेशन आयोजित केले आहे. तिरुपती बालाजी एस.आर.कन्व्हेन्शन हॉल येथे हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी,आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू व खा. छत्रपती शाहू महाराज यांना निमंत्रित केले आहे.
महाराष्ट्रामध्ये भोई समाजाची लोकसंख्या ३० ते ४० लाख आहे. असे असूनही समाजाचा एकही आमदार, खासदार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भोई समाजाचे नेते व संघटनेचे राष्ट्रीय महासचिव याना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, राज्यामध्ये जिल्हावार आर्थिक निकष निर्माण करण्यासाठी मॉर्डन आराखडा तयार करणे,भोई समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, विद्यार्थी वसतिगृह निर्माण करणे, इत्यादी मागण्यांसाठी या अधिवेशनातून आवाज उठविल्या जाणार आहे.
तरी या अधिवेशनाला बुलढाणा जिल्ह्यातील भोई समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्यातील भोई समाज सेवक श्री अंबादास जी मेसरे उपकोषागार अधिकारी, भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री निलेश भाऊ साटोटे,समाज सेवक श्री विजय भाऊ साटोटे,भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष तथा भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख श्री उमेश सुरेशराव राजगुरे यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा