Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२५
शेगाव व्हॉईस ऑफ मीडियाची कार्यकारणी जाहीर...
जिल्हा संघटक अमर बोरसे तर तालुकाध्यक्ष नाना पाटील तर सचिव पदी ज्ञानेश्वर ताकोते
शेगाव प्रतिनिधी - येथील विश्राम भवन मध्ये १४ जानेवारी रोजी व्हॉईस ऑफ मीडियाची बैठक ज्येष्ठ पत्रकार संजय सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
याप्रसंगी प्रदेश कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे, जिल्हा प्रवक्ता फहीम देशमुख, भाऊ भोजने, जिल्हा उपाध्यक्ष किशोरआप्पा भोसले, नितीन कानडजे, संभाजी टाले, यांची प्रमूख उपस्थीती होती.
व्हाईस ऑफ मीडियाच्या ध्येय धोरणांबद्दल माहिती देऊन पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया असल्याचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी सांगितले. त्यानंतर व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा संघटकपदी पत्रकार अमर बोरसे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी जाहीर केली. त्यानंतर शेगाव तालुकाध्यक्षपदी नानाराव पाटील, तालुका सचिव ज्ञानेश्वर ताकोते, शहराध्यक्ष दिनेश महाजन, डिजिटल विंग तालुकाध्यक्ष समीर देशमुख, तालुका कार्याध्यक्ष महेंद्र मिश्रा, तालुका उपाध्यक्ष सतीश अग्रवाल यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रकाश उन्हाळे, दिनेश घाटोळ, विवेक शेगावकर, राजवर्धन शेगोकार, संजय ठाकूर, विजय खंडेराव, सुधाकर बावस्कार, गोपाल हिंगणे, बाबुराव वानखडे, मंगेश सुधाकर ढोले,राहुल रिंढे, मंगेश तायडे आदी सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक नाना पाटील यांनी तर संचालन रोहित देशमुख तर आभार समीर देशमुख यांनी केले.
व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांसाठी कार्य करत असून पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणाकरिता सतत झटत राहणार.
व्हॉइस ऑफ मीडिया म्हणजे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संघटना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पत्रकारांनी या संघटनेमध्ये सामील होण्याचे आवाहन कृष्णा सपकाळ जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया यांनी यावेळी केले.
संत नगरी श्री संत गजानन महाराज यांच्या चरणाने पावन झालेली भूमी असून संपूर्ण देशातून पत्रकार संतनगरीमध्ये येत असतात. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील सर्वात मोठे पत्रकार भवन संत नगरीमध्ये व्हावे व या भव्य पत्रकार भावना करता व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शंभर टक्के प्रयत्न करणार. असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष नाना पाटील यांनी यावेळी प्रतिपादन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा