Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२५
Home
/
Unlabelled
/
"आ.अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र" शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
"आ.अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र" शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
"आ.अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र" शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, दुसऱ्या बॅचसाठी सोमवारी 20 जानेवारी रोजी निवड चाचणी
शिरपूर : "आमदार अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र" शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दुसऱ्या बॅच साठी सोमवारी 20 जानेवारी रोजी आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 9 वाजता मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
एस.व्ही.के.एम. अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, एस.व्ही.के.एम. सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे पोलीस भरती प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत 13 ऑक्टोबर 2024 रोजी राजगोपाल भंडारी हॉल, आर.सी.पटेल मेन बिल्डिंग, शिरपूर येथील पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला होता.
आतापर्यंत या शिबिरामुळे 2 मुलांची टी. ए. पॅरा ग्राऊंड साठी निवड झाली आहे. तसेच अग्निवीर आर्मीसाठी 2 मुलांची ग्राऊंड, पेपर, मेडिकल साठी निवड झाली आहे. मनोज रमेश पाटील याची पी. एस. आय. ग्राऊंड साठी निवड झाली आहे. तसेच या प्रशिक्षण केंद्राची विमला पावरा विद्यापीठात 1500 मी. स्पर्धेत द्वितीय, सुनिता पावरा विद्यापीठात 800 मी. स्पर्धेत द्वितीय, आकाश पावरा 900 मी. स्पर्धेत ऑल इंडिया युनिव्हर्सिटी निवड, गोविंद पावरा क्रॉस कंट्री 10किमी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर निवड झाली आहे. मागील अडीच महिन्यात या प्रमाणे मुले मुली यांची स्तुत्य निवड भरती झाली असून बाकी मुले महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या भरतीसाठी तयार आहेत. सध्या मुले सातत्याने 12 कि.मी. न थकता धावत आहेत. मागील अडीच महिन्याची बॅच सुरू झाली असून आता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण निवड चाचणी करिता नवीन मुलांची बॅच सुरू करण्यात येणार आहे. सदर दुसऱ्या बॅच मध्ये अगोदर सोमवारी 20 जानेवारी रोजी आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 9 वाजता मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येऊन नंतर त्यांना शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुलामुलींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी केले आहे.
तसेच पोलीस भरतीसाठी शारीरिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुभाष पावरा यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. मेरिट प्रमाणे प्राधान्य क्रमाने पुढील उर्वरित विद्यार्थी प्रशिक्षण साठी घेण्यात येणार आहेत. सदर भरतीपूर्व प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिरपूर शहर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी घेतली आहे.
शिरपूर तालुक्यातील असंख्य युवक, युवतींना अधिकारी घडविण्यासाठी यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येत आहे. 18 एकर जागेवर दहिवद येथे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग स्कूल निर्माण करुन परदेशात लायक ठरतील असे प्रशिक्षित ड्रायवर बनवून त्यांना इंग्रजी व जर्मन भाषा देखील शिकविण्यात येणार आहे. तसेच याच ठिकाणी 'आमदार अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र' शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवती यांच्यासाठी नियमितपणे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा