Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ मार्च, २०२५
Home
/
Unlabelled
/
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान...!.
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान...!.
शिरपूर प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनानिमित्त हॉटेल साई स्वाद, शिरपूर येथे ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी यांच्याकडून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, प्रशासन, स्वयंपाकी, बस वाहक, क्रिडा या प्रकारातून महिलांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात
गेल्या 14 वर्षापासुन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, प्रशासन, पर्यावरण क्षेत्रात सेवाभाव म्हणून काम करणारी तालुक्यातील कुरखळी येथील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कौटुंबिक व नौकरी तसेच प्रशासकीय जबाबदारी सांभाळून उल्लेखनीय काम करून सेवा देणार्या महिलांना सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प, पेन देऊन सन्मानित करण्यात आले.
आला.8 मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना सन्मानित करून साजरा केला जातो. तसेच संस्थेचा महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेचा वर्धापन दिन सन्मानार्थी व प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष
संगीताताई देवरे - माजी नगराध्यक्ष शिरपूर वरवाडे नगरपालिका, प्रशिका निकम - उपविभागीय जलसंधारण अधिकारी वर्ग 1, सौ वैशाली निकम - बाल प्रकल्प अधिकारी, सौ डॉ.नीता सोनवणे - शिक्षण विस्तार अधिकारी, सौ. नीता पाटील - मार्गदर्शक यशदा पुणे, सौ डॉ.जया जाणे, प्राध्यापक आयुर्वेदिक महाविद्यालय बोराडी, सौ क्रांति जाधव मुख्याध्यापिका आरसीपी प्राथमिक शाळा खर्दे, सौ मणिकर्णिका मोरे - मार्गदर्शक ज्ञानदीप प्रतिष्ठान कुरखळी, वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण पाटील, ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर मोरे, कार्याध्यक्ष मनोहर वाघ, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव नेहा मोरे, खजिनदार मुरलीधर मोरे, सदस्य वर्षा ताई पाटील, सदस्य दुर्गेश मोरे, हेमकांत मोरे, चंद्रकांत मोरे, श्रीम. मनिषा दिपक मोरे,सिंधुबाई पाटील, सौ. वैशाली वाघ, निर्मलाबाई वाघ, मनीषा पाटील, निर्मला शिरसाठ, अनिता पाटील, सीमा पाटील, सोनल मोरे, शुभांगी ताई मोरे, पुष्पाताई मोरे, सुनंदाताई मोरे, कल्पनाताई मोरे, मोनाली पाटील, कविता गावित, दत्तू दादा गावित, नरेश मोरे, जितेंद्र मोरे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी हॉटेल साई स्वाद चे संचालक अरविंद राजपूत व कर्मचारी तसेच बातमी कट्टा चे संपादक अमोल राजपूत यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन कार्याध्यक्ष मनोहर वाघ यांनी तर श्रीम.मनिषा मोरे यांनी आभार मानले.
यांना सन्मानित करण्यात आले.
शिरपूर शहर पोलीस ठाणे- वर्षा विश्वास चौधरी, सामाजिक कार्य - मीनाक्षी अंकुश राठी, आशा सुपरवायझर- भावना अजय बोरसे, अंगणवाडी सेविका- संध्या नरेश मोरे,
सावित्रीबाई फुले निवासी मूकबधिर मूला मूल- मुलांची शाळा- आशाताई खेमचंद पवार, बस वाहक (कंडक्टर) - सुरेखा दीपक साळुंखे, निवडणूक विभाग- कविता जितेंद्र मोरे,
वसतिगृह अधीक्षक- सुवर्णा दिलीप शिंदे, सफाई कर्मचारी (शिरपूर वरवाडे नगर पालिका) - इंदुबाई सुदाम भिल,
स्वयंपाक मदतनीस- (जि. प. मराठी शाळा गिधाडे) - सुजाता मिलिंद आखाडे, क्रिडा समन्वयक - मुकेशभाई पटेल सैनिकी शाळा- डॉ ज्योत्स्ना ईश्वर जाधव, अधिपरिचारिका - उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर - वंदना रामसिंग कोळी यां महिला सदस्यांना बुके, पेन, सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
मनोगत:- 1) योगेश्वर मोरे अध्यक्ष- ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वसा, संकल्पना, जिद्द विचार जोपासण्याचा पूर्ण प्रयत्न करू. येणार्या काळात विविध क्षेत्रात सेवेचे व ज्ञानदानाचे कार्य तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमातून सेवेचे कार्य ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान करेल.
2) नीता पाटील ( प्रशिक्षक- यशदा ) विविध क्षेत्रातील सेवाव्रत काम करणार्या महिलांना सन्मानासाठी समाजाबद्दल अभ्यास, भान अणि प्रेम या तीन गोष्टी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमधे आहे म्हणून संस्थेकडून कौतुकास्पद कामे होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा