Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ एप्रिल, २०२५
अमळनेर येथील ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन
प्रतिनीधी:-गणेश चव्हाण
अमळनेरऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील मानधन अद्याप न मिळाल्याने अमळनेर येथील ग्रामरोजगार सहाय्यकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. पंचायत समिती स्तरावर दिनांक 2 एप्रिल रोजी हे मानधन प्राप्त झालं असतानाही, आजपर्यंत संबंधित सहाय्यकांना प्रत्यक्षात रक्कम वितरित झालेली नाही.
या संदर्भात संघटनेमार्फत निवेदन देण्यात आलं असून, त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, “ग्रामरोजगार सहाय्यकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत नियमितपणे काम केलं आहे. मात्र, सहा महिन्यांपासून मानधन थकलेलं आहे. शासन स्तरावरून निधी प्राप्त असूनदेखील तालुका स्तरावर वितरणास विलंब होत आहे, त्यामुळे सहाय्यकांना जगण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे."
या परिस्थितीमुळे सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. "जोपर्यंत थकीत मानधन आमच्या खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील," असा ठाम निर्धार सहाय्यकांनी व्यक्त केला आहे.
सध्या तालुक्यातील तब्बल 119 ग्रामपंचायतींमधील ग्रामरोजगार सहाय्यक काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सहाय्यकांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा