Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५
थाळनेरला दारूबंदीसाठी महिलांनी ग्रामपंचायत व पोलिस स्टेशनवर नेला धडक मोर्चा
थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील दारूबंदीसाठी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायत वर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा नेत तक्रारीचे निवेदन दिले.गावात दारूबंदी झाली नाही तर कायदा हातात घेण्याची धमकी महिलांनी पोलिसांना दिली.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील महिलांनी निवेदनाची प्रत घेत ग्रामपंचायतवर घोषणा देत धडक मोर्चा आणला.या महिलांनी लोकनियुक्त महिला सरपंच सो.मेघा संदीप निकम यांना निवेदनाची देत गावात दारूबंदी करण्याची मागणी केली.यावेळी महिला सरपंचांनी लवकरच दारूबंदीसाठी ग्रामपंचायत कडून पावले उचलले जातील असे आश्वासन दिले.
यानंतर सदर महिलांचा मोर्चा ग्रामपंचायत,बाजारपेठ, नवलपुरा असा पोलीस स्टेशनवर धडकला. मोर्चेतील महिला गावात दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत होते.पोलीस स्टेशन मध्ये एपीआय शत्रुघन पाटील यांनी महिलांकडून निवेदन स्वीकारले.यावेळी महिलांनी पोलिसांसमोर आपल्या घरातील कैफियत मांडली.दारूमुळे घरात रोज भांडणे होत आहेत.दारूमुळे महिलांना पुरुषांच्या हातून मार खावा लागतो,दारुमुळे घर उध्वस्त होत आहेत, दारूच्या आहारी तरुण मुलं देखील गेली आहेत. त्यामुळे तरुण मुलांची लग्न होत नाहीत. पोलिसांनी कठोर पावलं उचलत दारूबंदी करावी अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल.या निवेदनात गावात प्रत्येक भागात व गल्लीत ठीक ठिकाणी बिनधास्त दारू विक्री सुरू आहे.त्यामुळे अनेक जण दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालतात व भांडण करतात.याचा त्रास गावातील व गल्लीतील लोकांना होत असतो.
दारुमुळे गोरगरीब लोकांचा परिवार उध्वस्त होत आहे व त्यांचा उदरनिर्वाह देखील होत नाही.त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होत आहे. गावातील दारू दुकाने बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या मोर्चात कमलाबाई कोळी,
अनिताबाई माळी,पुष्पाबाई कोळी, नर्मदाबाई माळी, सारिकाबाई कोळी भटाभाई कोळी,निर्मलाबाई कोळी सुशिलाबाई कोळी,सुनीताबाई कोळी, बेबाबाई कोळी,सुरेखाबाई कोळी,
चंद्रकलाबाई कोळी,अनिता कोळी,
किर्तीबाई कोळी विमलबाई कोळी,
निलाबाई कोळी,योगिताबाई कोळी,
कमलबाई कोळी प्रमिलाबाई कोळी,
संगीताबाई कोळी,आदी महिला सामील होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा