Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ मे, २०२५

पोशिंदाचा ऑरगॅनिक खताचे महत्त्व व शेतातील वापर बळीराजाला वरदान ठरत आहे.



सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताचे मूल्य समजून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे सध्या रासायनिक खतांच्या तसेच पाण्याच्या अति वापराने जमिनींची सुपीकता कमी होत चालली आहे.अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे झाले आहे की ज्या वेळी पिके एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता दाखवू लागतात त्याच वेळी शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतात.पोशिंदा पोटॅश सारख्या किंवा विराज मायक्रो न्यूटरीशन,पोशिंदा बर्ड मिंग ब्लु सारख्या उत्कृष्ट दर्जाचा
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पुरेशा प्रमाणात केला नाही तर पीक उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही,तर अन्नसाखळीद्वारे मनुष्य तसेच जनावरे यांच्या शरीरातही त्यांचा अनुकूल प्रभाव दिसून येण्यास मदत होईल.
जे शेतकरी रासायनिक खतांच्या वापरावर भर देतात ते देखील आपल्या शेतात सुरवातीचे "डोस' म्हणून गांडूळ खत किंवा शेणखताचा वापर करतात. ही अनेक वर्षांपूर्वीपासूनची पद्धत आहे.
सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत वा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते याचे महत्त्व आता पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहे. शेतकरी पोशिंदा चा ऑरगॅनिक खताचा वापरावर नव्याने भर देताना दिसत आहे. विकसित देशांमधील शेतकरी याबाबत अधिक जागरूक असून सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्याने रासायनिक खतांच्या वापरात 25 टक्‍क्‍यापर्यंत बचत करणे त्याला शक्‍य झाले आहे त्यामुळे पोशिंदा चा ऑरगॅनिक खताला चांगला वाव आहे.यात ऊस,बागमळा पिके, फळ व फुलपिके अशी पिके या खताला चांगला प्रतिसाद देतात.अर्थात द्विदलवर्गीय पिकांमध्ये या खताचा वापर मार्गदर्शक आहे पोशिंदा ची खते वापरणारे शेतकरी तर आपल्या शेतातील वापरासाठी त्याचा वापर करू शकतात.या खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक असतातच शिवाय त्यात कॅल्शिअम हा घटकही असतो.ते मुळातच सेंद्रिय असल्याने त्याचे कंपोसिंटग करण्याची गरज भासत नाही.त्याचा शेतात थेट वापर करता येतो.
 बाजारातील अन्य खतांच्या तुलनेत पोशिंदा चा खताची किंमतही कमी आहे.त्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

 पोशिंदा चा सेंद्रिय खताचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन वापरायला हवे

जमिनीची सुपीकता घटत चालल्याचे मुख्य उदाहरण पाहण्यास मिळते ते ऊस शेतीत. या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संकल्पना राबवणे गरजेचे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.शेणखत,पोशिंदा कंपोस्ट किंवा प्रेसमड यांचा वापर त्यासाठी महत्त्वाचा आहे. तागासारखे हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घेऊन लागवडीनंतर सुमारे 30 ते 45 दिवसांनंतर त्याचा वापर खत म्हणून करण्याची पद्धत आता अनक शेतकरी वापरू लागले आहेत.उसाच्या पानांमध्ये लोह किंवा जस्ताची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट व झिंक सल्फेटचा वापर करणे गरजेचे आहे.अझोस्पिरीलम आणि फॉस्फोबॅक्‍टेरिया यांचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. मातीचा सामूही नियंत्रित ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ पुढे म्हणतात.आपल्या जमिनी ऑरगॅनिक खताचा वापर वाढवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध