Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ मे, २०२५
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्याचे भूमिपुत्र श्री.शांताराम बिरारीस (काका सर) यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड; वाढदिवसाच्या दिवशीच मिळाला गौरव
साक्री तालुक्याचे भूमिपुत्र श्री.शांताराम बिरारीस (काका सर) यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड; वाढदिवसाच्या दिवशीच मिळाला गौरव
साक्री तालुक्यातील बल्हाणे गावाचे भूमी पुत्र व सद्या पिंपळनेर येथे वास्तव्यास असलेले
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले शांताराम रुपचंद बिरारीस यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून, विशेष म्हणजे हा गौरव त्यांना त्यांच्या ६५व्या वाढदिवसाच्या दिवशीच प्राप्त झाला आहे.त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक व राजकीय कार्यातील निःस्वार्थ योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवरील अधिकृत दखल आहे.
गेल्या चार दशके ते समाजसेवा,शिक्षणविकास आणि ग्रामीण भागातील लोककल्याणासाठी सतत कार्यरत आहेत.कोणत्याही पदाची,प्रसिद्धीची अथवा लाभाची अपेक्षा न ठेवता त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मोठा जनाधार लाभला असून,अनेकांच्या प्रेरणास्थान म्हणून ते ओळखले जातात.
या गौरवप्राप्तीनंतर त्यांच्या अर्धांगिनींकडून त्यांना आरोग्यदायी,यशस्वी आणि प्रेरणादायी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.गावकरी, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनीही त्यांना वाढदिवसानिमित्त आणि पुरस्कारासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून,येत्या काळातही त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडो, अशी भावना व्यक्त होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🛑 _अमळनेर : झोपडीला अचानक आग लागल्याने बोदर्डे येथील काशिनाथ दिलभर भिल या वृद्धाचे कुटुंब उघड्यावर आले असून संसार उध्वस्त झाल्याची घटना २...
-
अमळनेर : चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ व आरोपीची सखोल चौकशी करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्...
-
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग अस...
-
शिरपूर प्रतिनिधी - पळासनेर शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरच्या दारूबंदी विभागाने सापळा लावत पर राज्यातील 27 बिअरचे बॉक्स जप्त करत द...
-
सध्या साक्री तालुक्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (Private Agriculture Markets) झपाट्याने सुळसुळाट होत असून, प्रत्येक गावाच्या कोपऱ...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर आगाराच्या शिरपूर-पुणे बसमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला अरेरावी करत बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स...
-
साक्री तालुक्यातील बल्हाणे गावाचे भूमी पुत्र व सद्या पिंपळनेर येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...
-
साक्री (प्रतिनिधी) – खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली...
-
नंदुरबार प्रतिनिधी : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा व शिंदे शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आहे. 'लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस...
-
धुळे,नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा