Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ मे, २०२५
Home
/
Unlabelled
/
निवडणुकीआधीच भाजप-शिवसेनेत जुंपली ;'योजना आम्ही आणतो विरोधक मात्र बंद पडतात,' गावितांकडून खरपूस समाचार
निवडणुकीआधीच भाजप-शिवसेनेत जुंपली ;'योजना आम्ही आणतो विरोधक मात्र बंद पडतात,' गावितांकडून खरपूस समाचार
नंदुरबार प्रतिनिधी : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा व शिंदे शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आहे. 'लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप शांततेत चालू असताना कोणीतरी लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांचे माथे भडकवणे चूक आहे. आम्ही लोकांसाठी ज्या ज्या वेळी योजना आणल्या. त्या त्यावेळी त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना दखल घेण्याचा अधिकार नाही.योजना शासनाच्याच असतात हे खरे आहे. परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते. जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या, ज्याने नवीन काही योजना आणली आहे आणि लोकांना लाभ दिला आहे,' अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
गावित म्हणाले, डॉ. सुप्रिया गावित, डॉ.हिना गावित आणि आम्ही कायमच वेगवेगळ्या योजना आणत असतो लोकांना लाभ देत असतो. मात्र हे घरी झोपून राहतात योजना कशा येतील? असा प्रश्न करून डॉक्टर गावित पुढे म्हणाले, आम्ही ज्या ज्या वेळी योजना आणल्या त्या बंद पाडण्याचाच प्रयत्न यांनी केला. शेतकऱ्यांसाठी विहीर वाटप सुरू केले, यांनी तक्रार करून बंद केले. शेतकऱ्यांना शेळी मेंढ्या वाटप सुरू केले, तर खोटे दाखले जोडतात सांगून तक्रारी केल्या. आदिवासींसाठी गाय वाटपाची योजना आणली, तर ती सुद्धा खोट्या तक्रारी करून यांनी बंद पाडली. अशा लोकांना येथे वाटपाच्या ठिकाणी येऊन लाभार्थ्यांना शिकवण्याचा अधिकार नाही, असे शब्दांत गावितांनी फटकारले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा