Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३० मे, २०२५
अमळनेर क्रीडा संकुलाच्या दोन्ही बहुउद्देशीय हॉल व क्रीडा मैदानाचे लोकार्पण
पालकमंत्री गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
अमळनेर : तालुक्यातील क्रीडा संकुलातील जुन्या व नव्या बहुउउद्देशीय सभागृह सह खेळाच्या मैदानांचे लोकार्पण जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री तथा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने १० कोटी ६६ लाख ९८ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता क्रीडा संकुलसाठी घेण्यात आली होती. त्यापैकी प्राप्त झालेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून जुना बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती व सुविधा , ४०० मीटर धावन ट्रॅक दुरुस्ती , बास्केट बॉल चे काँक्रीट मैदान , स्केटिंग साठी काँक्रीट मैदान , व्हॉलीबॉल मैदान , तसेच कुस्ती ,ज्यूडो ,कराटे व इनडोअर कबड्डी साठी नवीन बहुउद्देशीय हॉल बांधण्यात आले आहेत. खेळाडूंसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. या सुविधांचे २९ रोजी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील , जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी जिप सदस्या जयश्री पाटील , माजी जिप सदस्या तिलोत्तमा पाटील , रिटा बाविस्कर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा ,तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी मुख्याधिकारी तुषार नेरकर , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ , कार्याध्यक्ष संजय पाटील , प्रा अमृत अग्रवाल , निलेश विसपुते , महेश माळी , कमलेश मोरे , माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील , प्रताप शिंपी , रावसाहेब पैलवान , शब्बीर पैलवान ,बाळू पाटील, गणेश ठाकरे , पिंटू भामरे ,सॅम शिंगाणे हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा