Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ मे, २०२५

चुलत मामानेच भाचीवर अत्याचार केला



     अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच  परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एकरुखी येथे घडली.


       एकरुखी येथील एका विवाहित महिलेचा  दोंडाईचा येथील पती दुसऱ्याच महिलेबरोबर पळून गेल्याने तिचा खावटी बाबत न्यायालयात खटला सुरू आहे. म्हणून ही महिला एकरुखी येथे आईवडिलांकडे राहत होती. महिलेचे आई वडील दसऱ्यानंतर ऊस तोडायला अहमदनगर येथे गेले  होते. मुलीचा न्यायालयात खटला सुरू होता म्हणून ते आपल्या मुलीला तिच्या  चुलत मामाकडे ठेवून गेले होते. चुलत मामाने आपल्या भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. पीडितेचे आई वडील परत आल्यानंतर आरोपी मामाने धमकी दिली की जर तू हा प्रकार तूझ्या आईवडिलांना सांगितला तर तुझ्या मुलीला ,तुझ्या वडिलांना मारून टाकेल , तुझ्या भावाचे लग्न मोडून टाकेल. पीडितेने तिच्या भावाचे लग्न झाल्यानन्तर २९ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानन्तर आरोपी मामाविरुद्ध भारतीय न्याय संहिता ६४ ,६४(२)(एम), ११५ ,३५२,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध