Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ मे, २०२५

आक्कल पाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी




अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून  पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी  केली आहे .


  यावर्षी आतापासूनच पाझरा काठावरील गावे भीषण पाणीटंचाई ला सामोरे जात आहे . विहिरींनी तळ गाठायला सुरवात केली आहे.काठावरील  गावात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली असून काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत.गुरे ढोरे यांचा पिण्याचा  प्रश्न उभा  ठाकला आहे .


            अमळनेर  तालुक्यतील साधारण तीस गावे पाझरा नदीवर अवलंबून आहेत त्यात न्याहडोद,कवठड,वालखेडा, जापी, शिरडाने, कंचनपुर, *अजंदे बु,*मांडळ , वावडे, मुड़ी, बोदर्डे ,*कळंबे,* लोण बू, लोण खु, लोण चारम,भरवस,बाम्हणे ,बेटावद ,भिलालि ,शहापूर, निम, तादळी गांवाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी तसेच पाईप लाईन काठावरून आहेत *यावर्षी पाझरा नदीला मोठा पूर येवून सुध्धा धरणात पाणीसाठा उपलब्ध होवू शकला नाही.* *धरणाची तसचं लहान केटिवि अरची दुरुस्ती व डागडुजी अभावी कोरडी पाडली आहे त्यामुळे त्वरीत आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली जात आहे.*

यावेळी माजी आमदार शरद पाटील, मिलिंद भावसार ,राज राजपूत,संतोष चौधरी, प्रकाश पाटील महेंद्र महाजन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.  *यावेळी संबंधितांची मीटिंग लावून त्वरित पाणी सोडण्या संदर्भात कार्यवाही केली जाईल असे धुळे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले..*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध