Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ जून, २०२५

खडसे फार्म्स,जळगांव येथील 100% ऑरगॅनिक खजूरचा बेटावद मार्केटमध्ये शुभारंभ..!



बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे मा.एकनाथ राव खडसे यांच्या मालकीच्या खडसे फार्म्स,जळगांव येथून आलेल्या उच्च प्रतीच्या 100% ऑरगॅनिक खजूरचा शुभारंभ नुकताच बेटावद मार्केटमध्ये पार पडला. या प्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पी.जी.वाणी यांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रम प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंत देशमुख, सुनील देशमुख, सतीलाल पाटील सर, हाजी इस्माईल बागवान,मुस्ताक मौलाना बागवान, तसेच छोटू पवार सर यांची उपस्थिती होती.

खडसे फार्म्सचे खजूर हे 100% ऑरगॅनिक असून चवीलाही गोड, व दर्जेदार असल्याने ग्राहकांमध्ये त्याला चांगलीच मागणी आहे. या खजुरांची खासियत म्हणजे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्णतः अभाव, त्यामुळे ते आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर ठरत आहेत.

या खजुरांची विक्री बेटावद येथील मुस्ताक बागवान यांच्या फ्रुट्स च्या दुकानात सुरू झाली असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत सध्या अशा नैसर्गिक व शुद्ध उत्पादनांची मागणी वाढत असल्याने खडसे फार्म्सच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध