Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ जून, २०२५
आर.सी.पटेल विद्यालयात व्यसन मुक्ती जनजागृती कार्यक्रम
शिरपूर प्रतिनिधी - 26 जुन शिरपूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्यसन मुक्ती दिनानिमित्त विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.व्यसनाधिनता व युवाजागृती हा कार्यक्रमाचा विषय होता.
या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून धुळे येथील पालेशा महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. डॉ. विलास चव्हाण, शिरपूर पोलीस स्टेशनचे पी.आय किशोरकुमार परदेशी, ए.पी.आय हेमंत खैरनार, प्राचार्य पी.आर.साळुंखे, पर्यवेक्षक डाॕ.एस.एन.पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एस.आय.हेमंत खैरनार यांनी केले.त्यात त्यांनी व्यसनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो,नकारात्मकता वाढते. त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.विलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे मानसिक व सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले.व्यसन म्हणजे मृत्यूचे आमंत्रण होय.व्यसनापासून दूर राहून स्वतःचे करियर घडविणे गरजेचे आहे.प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवनशैली, व्यसनमुक्त समाज व व्यसनमुक्त राष्ट्र निर्मिती साठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक डाॕ. एस. एन. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पो.हेड काॕ.चंदन सोनार, पो.काॕ.प्रशांत बाविस्कर व विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.बी.एन.अहिरे, डी.एस.
साळुंखे, एस.आर.पाटील,एस.आर. महाजन,श्रीमती रुपाली जोशी, श्रीमती जे.जे.माळी, श्रीमती एस. बी. हुलसुरे,
जी.एस.मराठे, कपिल बाविस्कर, बी. जे.गायकवाड, शिवराज बाविस्कर अमोल सोनार,एन के.देवरे, एम.एम.
परदेशी आदी शिक्षकांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा