Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
अंबरनाथच्या मिरॅकल कंपनीमधील "त्या" 259 कामगारांना आम्ही न्याय देणार -कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन
अंबरनाथच्या मिरॅकल कंपनीमधील "त्या" 259 कामगारांना आम्ही न्याय देणार -कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन
माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत झाली बैठक
कल्याण प्रतिनिधी :- दि.25 जून अंबरनाथच्या मिरॅकल कंपनीतील त्या 259 अन्यायग्रस्त कामगारांना आम्ही नक्कीच न्याय देऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज दिले.भाजपचे माजी आमदार आणि महाराष्ट्र परिश्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत ही बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत या बैठकीबाबत पूर्वसूचना देऊनही कंपनी मालक त्याला अनुपस्थित राहिल्याबद्दल संताप व्यक्त केला.
अंबरनाथमधील मिरॅकल केबल कंपनीने बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या 259 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र परिश्रम संघ या कामगार संघटनेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून कायदेशीर लढा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कामगार मंत्र्यांच्या प्रमूख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक आज पार पडली.
अंबरनाथच्या या मिरॅकल केबल कंपनी व्यवस्थापनाने गार्डनिंग, पॅकेजिंग आणि हाउस क्लिनिंगच्या नावाखाली अडीचशेहून अधिक कामगारांची भरती केली.आणि या कामगारांकडून कंपनीतील मुख्य स्वरूपाचे काम करून घेतले जात होते. तसेच किमान वेतन, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी असे कामगार कायद्यातील कोणतेही फायदे या कर्मचाऱ्यांना दिले जात नव्हते. एकप्रकारे या कंपनी व्यवस्थापनाकडून या कामगारांची अन्यायकारक पिवळणूक केली जात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कामगार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, तसेच कंपनी व्यवस्थापनाची ही चोरी पकडली गेल्यानंतर या 259 कामगारांना अन्यायकारक पद्धतीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले असून त्याविरोधात गेल्या 3 महिन्यांपासून लढा सुरू असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
हे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीला चांगलेच फैलावर घेतले. आजच्या बैठकीची माहिती असूनही मालक याठिकाणी उपस्थित का राहिले नाहीत असा संतप्त सवाल केला. त्यावर आजारपणाचे कारण पुढे करत कंपनीमालक या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचे या प्रतिनिधीद्वारे सांगण्यात आले. तसेच पुढच्या बैठकीला जर कंपनी मालक उपस्थित राहिले पाहिजेत. ते आले नाहीत तर आम्हाला कायदेशीर मार्गाने हिसका दाखवावा लागेल अशी तंबीही कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीला दिली. तर या बैठकीला उपस्थित असलेल्या अंबरनाथ मॅन्यूफॅक्चरिंगचे असोसिएशनचे अध्यक्षही कंपनी प्रतिनिधीसोबत उपस्थित होते. परंतू या बैठकीशी तुमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत कामगार मंत्र्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आणि या अन्यायग्रस्त कामगारांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी कामगार राज्यमंत्री आकाश चौधरी यांनी दिले असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
या बैठिकला भाजपा प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील, महाराष्ट्र परिश्रम संघ सचिव दिलीप कुमार मुंढे हेदेखील उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा