Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ जून, २०२५

साक्री तालुका कृषी विभागाकडून 100% सबसिडीवर भुईमूग बियाण्याचे वाटप कारण्यात आले



साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगामासाठी 100 टक्क्यावर अनुदानावर भुईमूग बियाणे उपलब्ध करून दिले होते तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन मागणी अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या डीबीटी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांना भुईमूग शेंगा बियाणे देण्यात आले साक्री शहरातील सुप्रसिद्ध कृषी निविष्ठा विक्रेते यशवंत जी मोरे यांचा कृषि केंद्रावरूनसदर बियाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी साक्री तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब मंडळ अधिकारी तसेच विविध गावांचे कृषी सहाय्यक व मे यशवंत जी मोरे साक्री चे संचालक विशाल खैरनार तसेच तालुक्यातील विविध गावांचे शेतकरी यांचा उपस्थितीत बियाण्याचे वाटप करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध