Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ जून, २०२५
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू
तरूण गर्जना रिपोट
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आज सायंकाळी एका दुर्दैवी घटनेत पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अरुणा बलु भिल असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना - सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा भिल ह्या शेतात चारा काढण्यासाठी गेल्या होत्या. - दरम्यान, जुना मुडावद रस्त्यावर कैलास नगरच्या बाजूला त्या न रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने
उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मृतदेह बेटावद ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवला. पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले
होते. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी नरडाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. बेटावद आणि परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी मोठा हैदोस घातला आहे. गेल्या आठवड्यात अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे एका लग्नात आलेल्या आदिवासी युवकावरही अशाच प्रकारे हल्ला झाला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता.परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ झाला पाहिजे परिसरातील नागरीकांची मांगणी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा