Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ जून, २०२५

शिरपूर डीबी पथकाने दोघांना ठोकल्या बेड्या,१२ दुचाकी हस्तगत



शिरपूर/प्रतिनिधी- दि.१६ - स्पोर्टस बाईकला मागणी जास्त असल्याने दुचाकी चोरट्यांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला आहे. शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने केलेल्या कारवाईतून ही बाब समोर आली. दोन अट्टल चोरांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून १४ लाख रूपये किमतीच्या १२ बाईक हस्तगत केल्या. या दुचाकी धुळे, नंदुरबार, जळगाव, पानसमेल व बडवाणी आदी परिसरातून चोरल्या होत्या. अनिल जोबा पावरा (रा. शिंगावे) व दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा (रा. मोयदा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी वाघाडी, कुत्रे, शिंगावे व अर्थ या ठिकाणी चोरी केलेल्या दुचाकी लपवल्या होत्या. न्यायालयाने आरोपींची रवाणगी तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत केली आहे. 

त्यांच्याकडून भूनकाही गुन्हे उघडकी सयेण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशीयांच्या आदेशान्वये डीबीपथकाचे हवालदार राजें द्रकाकडे, रवींद्र आखडमल, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटूसाळुंखे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, विलास कोळी व जितेंद्र अहिरराव यांच्या पथकाने केली. कुत्रे फाट्यावर सापळा शिरपूर शहर पोलिस ठाण्यात विक्रमसिंग राजपुरोहित यांनी आपली स्पोर्टस बाईक चोरीझाल्याची फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना कुवे फाटा येथे काही जण चोरीची बाईक विकत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली. त्यांनी याबाबत डीबी पथकाला कारवाईबाबत मार्गदर्शन केले. डीबी पथकाने या ठिकाणी सापडा रचला. येथे दोन जणांना पकडून त्यांच्याकडे विचारपूस केली असता हे रॅकेट उघडकीस आले. या कारवाईचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध