Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
भूमी अभिलेख विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगारांना लाखोंचा गंडा! बिंग फुटण्यापूर्वीच कथित टोळी धुळ्यातून फरार
भूमी अभिलेख विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगारांना लाखोंचा गंडा! बिंग फुटण्यापूर्वीच कथित टोळी धुळ्यातून फरार
शिरपूर/ प्रतिनिधी शासनाच्या भूमी अभिलेख विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि विश्वास संपादन करून धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची कैफियत काही तरुणांनी मांडून या कथित टोळीचे खरे रूप समोर आणले आहे.तरुणांना फसविणारी ही टोळी त्यांचे कारनामे बाहेर येण्यापूर्वी धुळ्यातून पसार झाली आहे.भूमी अभिलेख विभागात कार्यरत धुळे येथील मुख्य अधिकारी या आर्थिक फसवणूक प्रकरणात सामील असून टोळी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
धुळे येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सदर कार्यालय सुरू करण्यात आले होते.तेथून भूमी अभिलेख विभागात नोकरी देण्याचे काम काही मंडळी चालवीत होती.
कार्यालयाचा थाटमाट पाहून बेरोजगार युवक नोकरी मिळेल यासाठी आकर्षित होत असत.त्यासाठी अनेकांनी संपर्क साधला.मात्र कालांतराने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धुळे,साक्री,
शिरपूर,दोंडाईचा,नंदुरबार जिल्ह्यातील काही तरुणांनी न्याय मिळावा यासाठी दैनिक तरुण गर्जना कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती त्यांनी कथन केली.
शासनाच्या भूमी अभिलेख विभागात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती निघाली असल्याचे समजल्याने धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांनी धुळे येथे असलेल्या कार्यालयात संपर्क साधला.
तेथील भीमाशंकर पारधी याने या तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले.मात्र त्यासाठी प्रत्येकी साडे तीन लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले.त्यानुसार काही तरुणांनी रक्कम जमा केली.पारधी याने नोकरी देण्याचा ठेका घेतलेल्या उत्तम भैरू पाटील यांच्याशी बोलणे करून दिले होते.दोघांच्या सांगण्याप्रमाणे रक्कम दिल्यावर तरुणांना सातारा जिल्ह्यातील कोडोली याठिकाणी दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना कोणतेही प्रमाणपत्र देण्यात आले नाही.धुळे येथे त्यांना पाठविण्यात आले.त्याठिकाणी त्यांना नोकरी बाबत निरोप मिळाला नाही.त्यांनी पारधी याच्याशी भेट करून विचारणा केल्यावर त्याने उडवा उडवी केली.मात्र आपले बिंग फुटू नये यासाठी तरुणांना धुळे येथील हॉटेल तरंग येथे असलेल्या केंद्रात नियुक्ती दिली.या तरुणांनी काम केले.त्यांनी पुन्हा नियुक्ती पत्र देण्याबाबत विचारणा केली असता सध्या जागा पूर्ण भरलेल्या आहेत.काही जागा रिक्त झाल्या की तुम्हाला लावले जाईल असे सांगून वेळ मारून नेली.या दरम्यान भूमी अभिलेख अधिकारी वाघ,गिरिजा भांड हे येत असत.काही महिने या तरुणांनी काम केले मात्र त्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही.याबाबत चौकशी केली असता वेबसाईट बंद असल्याचे कारण पुढे करण्यात आले.त्यानंतर या केंद्रात जाऊन पाहिले असता तेथे काम सुरू असल्याचे लक्षात आले असे या तरुणांनी सांगितले.तरुणांना भूमी अभिलेख विभागात नोकरी देण्यासाठी संशयित उत्तम भैरू पाटील( रा.सोलापूर),या विभागाचा प्रमुख अधिकारी वाघ( धुळे),भीमाशंकर पारधी(गोंदिया),गिरिजा भांड( मुंबई)
,विठ्ठल दारासिंग राठोड(पाचोरा)
,रत्नाकर थोरात( जालना) यांनी वेळोवेळी तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले.कोणाकडून तीन,दोन लाख अशा प्रकारे रक्कम घेतल्याचे या तरुणांनी दैनिक 'तरुण गर्जना' शी बोलताना सांगितले.
या आर्थिक फसवणूक प्रकरणात धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील गरीब परिवारातील बेरोजगार तरुणांचा समावेश आहे.त्यांच्या वडिलांनी मुलाला नोकरी लागेल यासाठी लाखो रुपयांची रक्कम मोठ्या परिश्रमातून उभी केली.मात्र मुलांची फसगत झाल्याचे कळताच त्यांना प्रचंड धक्का बसला आहे.तरुण मुलांचे तर स्वप्न भंगले.धुळे येथे कार्यरत असलेली ही मोठी टोळी असल्याची माहिती या तरुणांनी दिली.नियुक्ती पत्र मिळावे यासाठी वारंवार विचारणा होत असल्याने या टोळीतील भामटे सरकारी कागदपत्रे,साहित्य घेवून पसार झाले आहेत.त्यामुळे नोकरी देण्याचे काम हे निव्वळ फसवणूक करण्याचे एक षडयंत्र होते असे तरुणांनी त्यांची कैफियत मांडत असताना सांगितले.
शासनाने आमची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित व्यक्तींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करावी आणि आमची लाखो रुपयांची रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे.
चौकट
' तरुण गर्जना ' न्यायासाठी प्रयत्नशील
या तरुणांना शासन आणि पोलिस प्रशासन यांनी योग्य न्याय द्यावा आणि बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना तुरुंगात टाकावे यासाठी दैनिक ' तरुण गर्जना ' प्रयत्नशील राहणार आहे.या प्रकरणी तात्काळ कायदेशीर कारवाई झाली नाही तर याबाबत सविस्तर वृत्तांत पुढील अंकात प्रकाशित करण्यात येईल.बघू या,पोलिस प्रशासन काय कारवाई करते?
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा