Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरात कॉलनी भागात माजी नगरसेवकाच्या मुलीचे अतिक्रमण परप्रांतियांना अभय; जागा हडपण्याचा प्रयत्न...! उघड्या डोळ्यांनी पाहणारी नगर परिषद मिठाची गुळणी धरून गप्प का?
शिरपूर शहरात कॉलनी भागात माजी नगरसेवकाच्या मुलीचे अतिक्रमण परप्रांतियांना अभय; जागा हडपण्याचा प्रयत्न...! उघड्या डोळ्यांनी पाहणारी नगर परिषद मिठाची गुळणी धरून गप्प का?
शिरपूर/ प्रतिनिधी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीत स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवकाच्या मुलीने खुल्या जागेवर अतिक्रमण केले असून ती जागा परप्रांतीय व्यक्तीला देवून अभय दिलेले आहे .त्यामुळे ही मोक्याची जागा हडप करण्याचा छुपा डाव खेळला जात आहे.मात्र हा सारा प्रकार समोर दिसत असताना अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यास नगर परिषद प्रशासन मिठाची गुळणी धरून गप्प का बसले आहे? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.गोरगरिबांना कारवाईचा बडगा दाखविणारे नगर परिषद अधिकारी आता का कारवाई करण्याची धमक दाखवीत नाही?या अतिक्रमणामुळे कॉलनीतील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार माजी नगरसेवकाच्या मुलीने त्यांच्या कॉलनीतील मोकळी जागा बळकावली आहे.या अतिक्रमित जागेवर एका परप्रांतीय व्यक्तीला आश्रय देण्यात आला असून, तो या माजी नगरसेवकाच्या मदतीने जागेवर अतिक्रमण वाढवीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या व्यक्तीने सुमारे ८-१० फूट जागा बळकावून त्यावर पत्र्याचे शेड उभारले आहे, ज्यामुळे कॉलनीतील रहिवाशांना ये-जा करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. भविष्यात या जागेचा गैरवापर होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.कॉलनी भागात असलेली ही मोक्याची जागा हडप केली जाण्याचा हा छुपा डाव असावा अशी शंका निर्माण झाली आहे.नगर परिषद हा प्रकार उघड्या डोळ्यांनी दिसत असताना त्याकडे का डोळेझाक करीत आहे असा नागरिकांचा सवाल आहे.
या कॉलनी परिसरातील नागरिकांनी या अतिक्रमणाविरोधात १३/०१/२०२५ आणि १३/०२/२०२५ रोजी नगरपरिषदेकडे लेखी तक्रारी अर्ज दाखल केले होते. मात्र, आजपर्यंत यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.ज्यामुळे स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.माजी नगरसेवकाच्या दबावामुळेच नगरपालिका प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसावे, असा स्पष्ट आरोप नागरिक करत आहेत.
एखाद्या लोकप्रतिनिधीने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्यास तो नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरतो असे असतानाही नगरपरिषद या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगर प्रशासनाने स्थानिक नेत्यांच्या दबावापुढे न झुकता, तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
नगरपरिषदेने या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा नगर परिषद प्रशासनाला दिलेला आहे.
चौकट
शिरपूर वरवाडे नगर परिषद हद्दीत अनेक ठिकाणी मोक्याच्या जागी काही धनदांडगे यांनी जागा बळकावून त्यावर अतिक्रमण केले आहे.परंतु अनेक वर्षे उलटून देखील प्रशासन त्यावर हातोडा पडण्याची हिमत दाखवीत नाही याचे आश्चर्य वाटते.एखाद्या राजकीय नेत्याच्या मर्जीतील व्यक्तीने अतिक्रमण केले म्हणजे त्याला नगर परिषदेची कायदेशीर मान्यता मिळते का? असा जळजळीत सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.अशा व्यक्तींची अतिक्रमण का काढले जात नाही,त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा का दाखल केला जात नाही,त्यांना राजकीय संरक्षण देण्याचे कारण काय,कोणत्या नेत्याचा दबाव आहे या प्रश्नांची उत्तरे नगर परिषद प्रशासनाने अर्थात मुख्याधिकारी यांनी जनतेला दिली पाहिजे.शहरात रहदारी ही मोठी समस्या आहे.त्यात सार्वजनिक जागा,गटारी यावरील अतिक्रमणे हा मुख्य प्रश्न आहे.मात्र प्रशासन तेथे का लक्ष केंद्रित करीत नाही? आगामी काळात हा प्रश्न गंभीर होणार असून नगर परिषदेची निवडणूक होईल त्यावेळी त्याचे उत्तर मतदार नक्कीच देवून राजकीय लोकांना हिसका दाखविण्याचे काम करतील एवढे नक्की!
भूमी अभिलेख विभागात नोकरी देण्यासाठी आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा, टोळके फरार!
धुळे येथील भूमी अभिलेख विभागात कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचे आमिष दाखवून धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घालण्यात आला.हे वास्तव काही तरुणांनी उघड करून अनेक लबाड व्यक्तींचे चेहरे समोर आणले आहे. आपले कृष्ण कृत्य बाहेर येण्यापूर्वी लाखो रुपये गोळा करणारे काही जणांचे टोळके फरार झाले आहे.
या टोळीत भूमी अभिलेख अधिकारी सहभागी आहे.ज्यांनी तरुणांची फसवणूक केली आहे अशा बदमाश लोकांची नावे आणि हाती लागलेली माहिती याचा सविस्तर तपशील ' दै.तरुण गर्जना ' च्या पुढील अंकात!
- संपादक
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा