Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ जून, २०२५
मजुरांच्या मारहाणीत कैलास प्रजापतीचा मृत्यू
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झालेल्या जबर मारहाणीत जखमी कैलास शामसिंग प्रजापती याचा मृत्यू झाल्याने आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे*
२९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पातोंडा येथे विका सोसायटीच्या गोदामात विद्युत ठेकेदार राजेश शामसिंग प्रजापती रा खापरखेडा ता पिपरिया जि नर्मदापुरम मध्यप्रदेश याचा भाऊ कैलास शामसिंग प्रजापती हा पातोंडा येथील विका सोसायटी च्या गोदामात झोपले होते. रात्री सलीम उर्फ संदीप धुर्वे , गोपाळ धुर्वे साहुलाल धुर्वे , पंकज सेलू उमरावसिंग , शिवम फुलसिंग यांनी कैलास ला उठवून आताच्या आता ४० हजार रुपये दे म्हणून त्याच्याशी भांडू लागले. कैलास ने त्यांना आता पैसे नाही सकाळी पैसे देतो म्हणून सांगितले असता चौघांनी कैलास ला आर्थीन्ग चा लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने कैलासच्या नाकातोंडावर , पायावर वार केले तसेच दोन्ही हात फ्रॅक्चर केले. त्यात कैलास बेशुद्ध झाला. हे पाहून आरोपी पळून गेले. ३० रोजी सकाळी सुपरवायझर तिवारी मजुरांना घ्यायला गेले असता त्यांना कैलास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने धुळे येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला इंदोर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मारहाणीत कैलास रात्रीपासून बेशुद्ध होता जबरदस्त जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने छिंदवाडा मध्यप्रदेश व परिसरात आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा