Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ जून, २०२५
गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरूणाला अटक
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपये किमतीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
५ जून रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की क्रीडा संकुलाच्या भिंती आड एक जण बेकायदेशीर पिस्टल बाळगून आहे. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,निलेश मोरे ,विनोद संदानशिव , सिद्धांत शिसोदे याना बोलावून पिस्टल बाळगणाऱ्या इसमाला पकडण्याचे आदेश दिले. पोलिसांनी साडे सात वाजेच्या सुमारास शोध घेण्याचा प्रयत्न केला असता क्रीडा संकुलाच्या भिंती आड एक तरुण पोलिसांना पाहून पळू लागला. त्याला पकडून त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सिंगल बोअर चे पिस्टल व जिवंत काडतुस आढळून आले. त्याचे नाव चेतन उर्फ सत्तू किरण धोबी वय १९ रा शिवाजीनगर पैलाड असे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यजवळून २० हजारचे पिस्टल आणि ५०० रुपयांचे काडतुस जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध शस्र कायदा ३,५ आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा