Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ जून, २०२५
पाष्टे येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्या भिषेक दिन उत्साहात साजरा
:बेटावद,शिंदखेडा :- तालुक्यातील पाष्टे या गावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेच्या सुखासाठी आयुष्यभर झगडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील मौजे पाष्टे येथे मोठ्या उत्साहात ध्वजवंदन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा तालुका भाजपा अध्यक्ष, मा. नानासो मोतीलाल वाकडे उपस्थित होते. त्यांच्या सोबत मा. पाटील, दीपक पाटील, तसेच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पंचायत अधिकारी, कर्मचारी आणि संपूर्ण पाष्टे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजवंदनाने झाली. नंतर उपस्थित मान्यवरांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकला. मा. नानासो वाकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नेतृत्व नव्हते, तर ते आजही प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे विचार नव्या पिढीने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे."
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने अतिशय शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पार पडले. गावातील तरुणांनी सहभागी होत शिवजयंतीप्रमाणेच राज्याभिषेक दिनालाही अभिमानपूर्वक साजरा केला.
या उपक्रमामुळे गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी असा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात घेण्याचा संकल्प यावेळी केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा