Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ जून, २०२५
दोन लहान मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू
अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २ रोजी दुपारी घडली._
चेतन धनराज पवार वय (९) , मयुर उर्फ हरीश बाळू पाटील वय(१२) हे दोघे दुपारी नीम गावाला तापी नदीवर पोहायला गेले होते. गावात लग्न असल्यामुळे दोघे तेथे जेवायला गेले असतील आणि त्या गर्दीत कोणालाच काही कळले नाही. सायंकाळ पर्यंत घरी आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घ्यायला पालक व गावकरी गेले असता त्यांना दोघांचे कपडे नदी काठावर मिळून आले. अधिक शोध घेतला असता चेतनचा मृतदेह काठावर सापडला. त्याचे शव विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसरा मृतदेह शोधण्याचे सुरु आहे. मृतदेह शोधण्याचे प्रयत्न रात्री उशिरा पर्यंत चालू सुरु होते. मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, फिरोज बागवान,संजय पाटील, अगोने यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.
मयूर उर्फ हरीश चे वडील शेतमजूर आहेत. त्याला एक बहीण आहे. तर चेतन चे वडील मयत झाले असून तो आपल्या आजोबांकडे राहत होता. त्याला एक बहीण आहे. दोन्ही कुटुंबातील वारस गेल्याने संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा