Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ जून, २०२५
मुडी, बोदर्डे ,कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे त्रासदायक
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील काटेरी झुडुपे काढण्याची मागणी सर्वत्र होत आहे.
पांझरा काठावरील मुडी,बोदर्डे ते कळंबू रस्ता काटेरी बाभळींनी वेढला आहे. पूर्णपणे आत झाकला गेला. त्यामुळे वाहनधारकांना फांद्या लागून काट्यांचे ओरखडे ओढले जात आहे हा रस्ता बांधकाम विभागाचा आहे.तर डांगरी रस्ता देखील हीच परिस्थिती आहे. लोणमुडी रस्त्याची देखील अवस्था सारखीच आहे. यासह ग्रामीण भागातील जिल्हापरिषद आणि बांधकाम खात्याच्या रस्त्यांची अवस्था अशी आहे. वाहनांना ओरखडे ओढले जातात. बस मध्ये बसलेल्या खिडकीलगत बसलेल्या लोकांच्या तोंडाला देखील फटके बसतात. त्यामुळे रस्ते झुडुपेमय झाले आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यांवर जाताना पुढे वळण रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा अशा पद्धतीचा महत्त्वाचा सूचना फलक गेल्या अनेक दिवसापासून झुडपामुळे झाकले गेले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यांवर सतत अपघात होतात. धोकेदायक असलेल्या या जागेवर यापूर्वी अनेकदा अपघात झालेले आहेत. त्यात आता हे सूचना फलक झाकले गेल्याने मोठ्या छोट्या वाहनचालकांना रस्त्याच्या अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. संबंधित जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकामविभागाने या रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा