Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्याचा लोकप्रिय आ.सौं.मंजुळा गावीत यांचा अध्यक्षते खाली तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादात सपन्न.
साक्री तालुक्याचा लोकप्रिय आ.सौं.मंजुळा गावीत यांचा अध्यक्षते खाली तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादात सपन्न.
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने खरीप हंगामपूर्व तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय आमदार श्रीमती मंजुळाताई गावित यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.सुरज जगताप, तहसीलदार श्री. साहेबराव सोनवणे,कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री.कडू सर,तालुका कृषी अधिकारी श्री.योगेश दिगंबर सोनवणे,तसेच दहिवेलचे मंडळ कृषी अधिकारी श्री.हरिदास पवार कृषी अधिकारी श्री चेतन सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेत तालुक्यातील विविध मंडळांतील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.निजामपूर मंडळातील जैविक शेती करणारे शेतकरी श्री.दुल्लभ जाधव यांनी जीवामृत व दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमात पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून मृदा चाचणीचे आरोग्य महत्त्व,SRT व चारसुत्री भात लागवड तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, शेतीशाळा,पाणी फाउंडेशन व्हिडीओ, सेंद्रिय शेतीतील विविध तंत्रज्ञान (जीवामृत, बिजामृत, जैविक खते/कीटकनाशके/बुरशीनाशके),CRA तंत्रज्ञान,व फळबाग लागवड यावरील सखोल माहिती देण्यात आली.
प्रात्यक्षिक सत्रात पिंपळनेर मंडळातील कृषी सहाय्यक श्रीमती छाया वेंडाईत,श्रीमती सुर्वे, श्रीमती सुलभा बागुल,श्री.सर्जेराव अकलाडे व श्रीमती मेघने यांनी SRT पद्धतीने भात लागवड व CRA तंत्रज्ञानावर आधारित फळबाग लागवडीचे प्रात्यक्षिक सादर केले.
साक्री मंडळातील श्री. हेमंत आकलाडे, गोकुळ पवार,जितेंद्र पगारे,स्नेहल बोरसे,सीमा सोनवणे, राजू बारसे, निखिल शिंदे, नेनेश अहिराव व ललित आहिरराव यांनी माती नमुना संकलन,बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी या तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली
निजामपूर मंडळातील कृषी सहाय्यक श्री.अविनाश जाधव,श्रीमती मीनाक्षी वाघ व श्री. जितेंद्र देसले यांनी ५ टक्के निंबोळी अर्क व जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच दहिवेल मंडळातील कृषी सहाय्यक श्रीमती सहारे व श्रीमती अंजना चौरे यांनी फेरोमन ट्रॅप कसे लावावे याचे मार्गदर्शन प्रत्यक्ष दाखवून दिले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तालुका कृषी अधिकारी श्री.योगेश दिगंबर सोनवणे यांनी केले. त्यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री.तुषार मराठे यांनी केले.
या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली.भांडणे येथील प्रगतशील शेतकरी श्री. हेमंत देसले म्हणाले,“या कार्यशाळेमुळे आम्हाला माती परीक्षण, बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरला.”
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा