Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ जुलै, २०२५

शारीरिक शिक्षण तथा क्रीडा समन्वयक,शिरपूर 'शिक्षणाचं महत्व समजून घ्या.



मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक्षणाचं महत्व आपल्या जीवनात समजून घेईल तोचं भविष्यात टिकेल असं म्हणायला माझ्यामते हरकत नाही कारण मराठी भाषेमध्ये एक सुंदर म्हण आहे की 'जो शिकेल,
तोचं टिकेल' याचा अर्थ सरळ असाचं आहे की शिक्षणातून व्यक्तीला ज्ञान,
विविध कौशल्ये व जगण्यासाठी लागणारा आत्मविश्वास हा मिळत असल्यामुळे समृद्ध व चांगलं जीवन मानवाला जगता येतं आणि विशेष म्हणजे सदर व्यक्ती शिक्षित असल्याने समाजाच्या व देशाच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण असं योगदान तो देऊ शकतो,त्यामुळं शिक्षणाचं महत्व समाजातील प्रत्येक घटकाने समजून घ्यायलाच हवं असं मला वाटतं,त्यासह शिक्षण हे जीवनातील महत्वपूर्ण अंग असल्यानेच शिक्षण तळागळपर्यंत रुजलचं पाहिजे,खरंतर शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटलं जातं आणि त्याचं कारण ही खास आहे ज्याप्रमाणे आईचं दूध बाळासाठी गरजेचं असतं त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा मानवाला फार गरजेचं ठरतं,आपण शिक्षणातून विविध कौशल्य प्रभावीपणे आत्मसात करू शकतो,जी कौशल्य आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी सतत मदत करतात, चांगलं अथवा वाईट,नफा किंवा तोटा ह्या गोष्टीं आपण शिक्षणामुळेचं प्रभावीपणे समजू शकतो,शिक्षण हेचं आजच्या २१ व्या शतकातील आधुनिक युगात जगण्याचे एकमेव साधन आहे,त्यामुळं शिक्षणाची प्रत्येक बाजू विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे तर समाजातील प्रत्येक व्यक्ती हा जर विविध कौशल्याने सक्षम असेल तर तो भविष्यात आप-आपल्या आवडी-निवडीच्या क्षेत्रात एक विशिष्ट झेप तो घेऊ शकतो हिचं शिक्षणाची खरी ताकद सांगता येईल, भविष्याबाबत अधिक लक्ष्यवेधी शिक्षणामुळे आपण होऊशकतो,हे सुद्धा शिक्षणाचं एक उत्तम उदाहरण आहे.
        
शिक्षणाचं एक अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास आणि हे लक्षात घेता शिक्षण हे व्यक्ती विकासासाठी फार गरजेचं आहे व त्यातून व्यक्तीमत्व विकास कसा साधता येतो हे लक्षात घेऊन शिक्षण घेत राहणं फार गरजेचं आहे,नुसतं वाचन,लेखन देण्याचं कार्य शिक्षण करत नाही तर जीवन जगण्याचे साधन,कौशल्य प्रदान करतं,काळानुसार तुम्हाला जगणं शिकवत असतं म्हणून शिक्षण घेत रहावं हिचं अपेक्षा ठेवून,शिक्षणातून महत्वपूर्ण भूमिका समजून घ्याव्यात,जीवनाचा उद्देश यातूनचं आपल्याला समजतो, दैनंदिन जीवनात अनेक घटना घडत असतात,अडथळे येत असतात पण हे सर्व कशाप्रकारे हाताळायचं याची समज शिक्षणातून आपणांस प्राप्त होत असल्याने शिक्षणगाथा समजून शिक्षणाचे विविध पैलूंचा अभ्यास केला पाहिजे,जेणेकरून भविष्याला विकासाचा सूंदर आयाम देता येऊ शकतो,खरंतर शिक्षण ही गुणांची(मार्क) परिक्रमा नाही तर अनुभवाची सुंदर गाथा आहे,त्यामुळं विद्यार्थ्यांनी शिक्षण समजून घेणं गरजेचं आहे.


भरत कोळी
(शारीरिक शिक्षण तथा क्रीडा समन्वयक,शिरपूर)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध