Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ जुलै, २०२५
Home
/
Unlabelled
/
पत्नीचा अपघात नव्हे, खून! नरडाणा पोलिसांची धडक कारवाई – अवघ्या दोन तासांत पती अटकेत
पत्नीचा अपघात नव्हे, खून! नरडाणा पोलिसांची धडक कारवाई – अवघ्या दोन तासांत पती अटकेत
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत केवळ दोन तासांत खून प्रकरणाचा उलगडा केला. पत्नीला छतावरून ढकलून दिल्याची कबुली देत आरोपी पती उदय भिल याला अटक करण्यात आली आहे.
२५ जून रोजी सूनिता भिल (वय ३३) हीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात होते. मात्र मृतदेहेवरील गंभीर डोक्यावरील जखमा संशयास्पद वाटत होत्या. सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात पतीकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करून तिला छतावरून ढकलल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पती उदय भिल याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२(१) नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी तपासासाठी कार्यकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. या पथकात रवींद्र महाले, हेमंत पाटील, ललित पाटील, अनसिंग पवार, विक्रांत देसले, भरत चव्हाण नारायण गवळी, राकेश शिसाट, योगेश गिते, अर्पण र्मोरे, विजय माळी, सचिन बागुल आदींचासहकारऱ्यांचा समावेश होता.
नरडाणा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तपासातील सुस्पष्टता खरोखरच कौतुकास्पद असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा